मराठा विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण डिप्लोमा
जिल्हा प्रतिनिधीःअहमद अन्सारी परभणी
पाथरी शहरातील अक्षय कॉम्प्युटर्स च्या वतीने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येत आहे.
सारथी संस्थेच्या माध्यमातून आयोजित कौशल्य विकास कार्यक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आव्हाहन अक्षय कॉम्प्युटर्स चे संचालक तुकाराम पौळ यांनी केले आहे.महाराष्ट्र सारथी संस्थेच्या उपक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास आणि संगणक कौशल्य विकास आणि एमकेसिएल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून तालुका स्तरापर्यंत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सारथी लक्षीत गटातील मराठा समाजातील 18 ते 45 वयोगटातील पात्र उमेदवाराकडून 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सारथी संस्थेमार्फत तालुका स्तरापर्यंत मोफत व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील काही निवडक व अधिकृत अभ्यास केंद्र अक्षय कॉम्प्युटर्स येथे हे प्रशिक्षण दिले जाईल.यामध्ये एकूण चार मॉडूल शिकवले जातील 1) स्पोकन इंग्लिश,आयटी स्किल 2) अकाऊंटिंग क्षेत्रातील स्किल बँकिंग क्षेत्रातील स्किल 3) वेब डिजाईन ,फोटोशॉप हार्डवेअर नेटवर्किंग 4) प्रोग्रामिंग असे एकूण दहा पैकी चार मोडुल विद्यार्थी निवडू शकतो.
आपल्या नोकरी किंवा स्वतः च्या व्यवसाय करू शकतो शासनाचा या मागचा हाच हेतू की मराठा समाजातील विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे तरी पाथरी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पाथरी च्या अक्षय कॉम्प्युटर्स चे संचालक तुकाराम पौळ यांनी केले आहे अधिक माहितीसाठी आपण 8149474040 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करू शकता.