ताज्या घडामोडी

नेरी येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

दिनांक 4 नोव्हेंबर 2022 ला तालुका विधि सेवा समिती चिमूर च्या वतीने कायदेविषयक जनजागृतीचा कार्यक्रम ग्रामपंचायत नेरी येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात कायदेविषयक बाबीवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
नागरिकांमधील कायदे विषयी संभ्रम आणि असमंजस्य स्थिती दूर करण्याविषयी माहिती या चर्चासत्रातून देण्यात आली आणि नागरिकांना महिला कायदेविषयी, घरगुती हिंसाचार विषयी तसेच खोटे गुन्हे कसे दाखल करण्यात येतात या विषयावरील जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नेरी ग्रामपंचायत सरपंचा रेखा पिसे तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सांख्यिकी विस्तार अधिकारी नन्नावरे तसेच ग्रामपंचायत सचिव धावणे होते. या कार्यक्रमात कायदेविषयक मार्गदर्शक एडवोकेट सोंडवले, एडवोकेट मून, एडवोकेट मेश्राम होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ग्रामपंचायतीच्या समस्त कर्मचारी, सरपंचा, सदस्य व सचिव यांनी मोलाचे सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close