ताज्या घडामोडी

बुद्धीचे सामर्थ्य वाढवून विद्वत्तेचे शौर्य दाखविण्याची नितांत आज गरज आहे -समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

भीमा कोरेगाव हा दिन केवळ शौर्य दिन म्हणून साजरा न करता त्यातून नवइतिहास घडविण्यासाठी मानवतावादी चळवळ भक्कम करण्यासाठी न्यायाच्या लढ्याला गतिमान करण्यासाठी बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानिक लोकशाही व्यवस्थेच्या संरक्षणासाठी उच्च कोटीचे बुद्धी सामर्थ्य व बुद्धी कोशल्य निर्माण करावे लागणार आहे प्रचंड वाचन ,अभ्यास चिंतन करून लेखणीच्या जोरावर विचारातून क्रांती घडवावी

ही भारतभूमी युद्धभूमी नाही बुद्धभूमी आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी बाबासाहेबांनी जी चळवळ सांगितले त्या मार्गावर आजच्या नवयुवकानी जागरूक राहुन आपले बुद्धी सामर्थ्य वाढवून विद्वतेचे शौर्य दाखविण्याची आज नितांत गरज आहे असे प्रतिपादन ड्रा बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी प्रियदर्शी सम्राट अशोक फौंडेशन काजळसर इथे शौर्य दिन आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या की बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली आहे जाती अंताची लढाई सुरू केली होती जाती अंताशिवाय देश एकराष्ट्र म्हणून विकसित होणार नाही व समस्त बहुजन वर्गाचा ही विकास होणार नाही तेव्हा आता तलवारीची जागा लेखणीने घेतली आहे

व त्यातूनच आता कुठल्याही प्रकाची गुलामी झुगारून देता येते हीच पूर्वजांच्या शौर्यला खरी मानवंदना ठरेल या कार्यक्रमाच्यावेळी बार्टी च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांच्या हस्ते प्रियदर्शी सम्राट अशोक वाचनालयाचे सुद्धा उदघाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे अद्यक्ष रामदास दुधनकर होते तर प्रमुख मार्गदर्शक बार्टी च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे प्रमुख अतिथी पंचायत समिती सदस्य नर्मदा रामटेके,ग्रामपंचायत सदस्य लता खोब्रागडे प्राचार्य जी टी खोब्रागडे, अंगणवाडी सेविका खोब्रागडे, प्रशांत मेश्राम होते या कार्यक्रमाचे रातीराम पाटील यांनी केले तर प्रास्ताविक ऍड मिलिंद मेश्राम व आभार प्रदर्शन रामदास पाटील यांनी मानले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close