पाथरी येथील शांताई निवासस्थानी राजेंद्र नागवडे यांची सदिच्छा भेट
सव्वाचार लाख हजार मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप
लक्ष्मी नृसिंह कारखान्याचे जेष्ठ संचालक राजेंद्र नागवडे यांची माहिती.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
लक्ष्मी नृसिंह साखर कारखाण्या अंतर्गत परभणी,पाथरी व मानवत तालुक्यातील ४ लाख २९ हजार मेट्रिक टन असे विक्रमी उसाचे गाळप झाले असुन ६ लाख मेट्रिक टनाचे उदिष्ट्यपुर्ती होईल अशी माहिती जेष्ठ संचालक राजेंद्र नागवडे यांनी दिली आहे. लक्ष्मी नृसिंह साखरकारखान्याचे जेष्ठ संचालक तथा कै.शिवाजीदादा नागवडे साखरकारखाना श्रीगोंदा चे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी सोमवार १४ मार्च रोजी पाथरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांचे शांताई निवासस्थानी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी चर्चा करतांना त्यांनी हि माहिती दिली.
प्रारंभी श्रीगोंदा येथील कै.शिवाजीदादा नागवडे साखर कारखान्याच्या चेअमनपदी नव्याने पुन्हा निवड झाल्याबद्दल राजेंद्र नागवडे यांचा सभापती अनिलराव नखाते यांनी सत्कार केला. याप्रसंगी राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते गंगाधरराव गायकवाड,भगवानराव पौळ,हादगांव बु चे सरपंच बिभीषण नखाते ,लक्ष्मण नखाते,नितीन इंगळे यांची उपस्थिती होती.
यावेळी चर्चा करतांना राजेंद्र नागवडे म्हणाले की,लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याची गाळप क्षमता हि २ हजार ५०० मेट्रिक टन असली तरी आम्ही ६ लाख मेट्रिक टन गाळपाचे उदीष्ट ठेवले आहे. त्यापैकी आज मित्तीला ४ लाख २९ हजार मेट्रिक टन उस गाळप पुर्ण झालेले आहे.पाथरी येथील उद्भवलेली परिस्थिती पाहता आमदार बाबाजाणी दुर्राणी ,सभापती अनिलराव नखाते यांचे पाठपुरावा व सदोदित संपर्कामुळे पाथरी परिसरातील उस गाळपावर माझे वैयक्तिक लक्ष असल्याचे त्यांनी यावेळी अवर्जुन सांगितले.कारखाना परिसरातील उर्वरित उस गाळप पुर्ण करू अशी ग्वाही यावेळी राजेंद्र नागवडे यांनी दिली.
श्रीगोंदा साखर कारखान्याच्या अनुभवातून लक्ष्मी साखरकारखाना येथे इथाँलीन प्रकल्पाअंतर्गत दररोज ४५ हजार लीटर बिसलरी वाँटर चा प्रकल्प हाती घेतला असुन तो अंतीम टप्यात आहे.एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने सुरू होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक राजेंद्र नागवडे यांनी सोमवारी पाथरी बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांचे निवासस्थानी भेट दिली याप्रसंगी कै. शिवाजीदादा नागवडे सहकारी साखर कारखाण्यावर पुन्हा चेअरमन पदी निवड झाल्या बद्दल राजेंद्र नागवडे यांचा सभापती अनिलराव नखाते यांनी सत्कार केला .याप्रसंगी गंगाधरराव गायकवाड,भगवानराव पौळ,हादगांव बु चे सरपंच बिभीषण नखाते,लक्ष्मण नखाते,नितीन इंगळे आदी उपस्थित होते.