ताज्या घडामोडी
नेरी ग्रामपंचायत चे नेताजी वार्डाकडे दुर्लक्ष

बंद पडलेले सोलर पंप
नेरी येथील ग्रामपंचायत चे नेताजी वार्डाकडे दुर्लक्ष – पिंटु खाटीक यांचा आरोप
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
नेरी येथे एक वर्षाआधी पाण्याची टंचाई होऊ नये म्हणुन वार्डा वार्डात सोलर पंप लावण्यात आले तसेच एक सोलर पंप नेरी येथील नेताजी वार्डातील संजय वैरागडे यांच्या घराजवळ लावण्यात आले ते सोलर पंप मागील दोन महीन्या पासुन बंद पडले आहे . ग्रामपंचायत मधील कर्मच्याऱ्यांना वारंवार सांगुन ही अजुनपर्यंत त्या सोलर पंप ला दुरस्ती करण्या करीता कोणीही आले नाही . नेताजी वार्डातील ग्रामवासीयांची पाण्यासाठी भटकंती होत आहे सोलर पंप लवकरात लवकर दुरस्त करुण देण्यात यावा ग्रामपंचायतीचे नेताजी वार्डाकडे दुर्लक्ष होत आहे असे आरोप माजी तंटामुक्ती अध्यक्ष पिंटु खाटीक यांनी केला आहे .