पंतप्रधानांच्या उपस्थितीत मध्यप्रदेशातील झबुवा येथे भरला विशाल आदिवासींचा महाकुंभ
अनेक राज्यांच्या आदिवासी मंत्र्यांसह खा.अशोक नेते यांची उपस्थिती व आभार प्रदर्शनाची जबाबदारी .
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
मध्य प्रदेशातील झबुवा येथे आज दिनांक. (११ फेब्रु.) रोज रविवारी देशभरातील आदिवासी लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रात कार्यरत आदिवासी समाजातील मान्यवर, पदाधिकारी आदींचा विशाल महाकुंभ भरला होता. या महासंमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले.
या देशपातळीवरील आदिवासी महाकुंभच्या आभार प्रदर्शनाची जबाबदारी गडचिरोली चिमूर क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्च्याचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्याकडे देण्यात आली होती.
यावेळी मार्गदर्शन करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील भाजपच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या दहा वर्षात आदिवासी समाजासाठी राबविलेल्या विविध योजनांची माहिती देऊन या योजनांमुळे आदिवासी समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येत असल्याचे सांगितले. पुढील काळातही भाजप सरकार आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आभार प्रदर्शन करतांना खासदार अशोक नेते यांनी आदिवासी महाकुंभाला उपस्थित देशभरातून आलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त करताना सरकारच्या आदिवासी समाजासाठी असलेल्या योजनांमुळे समाज मुख्य प्रवाहात येत असून त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दूरदृष्टीला जाते असे खा.नेते आभार व्यक्त करत म्हणाले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशातील आदिवासीबहुल भागातील अनेक विविध विकासाच्या कामांचे ऑनलाइन लोकार्पण आणि भूमिपूजन केले.
या महासंमेलनाला गुजरात, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान, अशा अनेक राज्यातून आदिवासी समाज बांधव आले होते.
यावेळी प्रामुख्याने केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जून मुंडा, केंद्रिय मंत्री फगनसिग कुलस्ते, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्राचे आदिवासीमंत्री विजयकुमार गावित, केंद्रीय मंत्री भारती पवार, जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष समिर ओराव आणि मोठ्या संख्येने जनजाती मोर्चाचे नेते उपस्थित होते.