परिवार कल्याणासाठी सरकार योग्य पावले उचलणार का ?
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
कायद्याच्या वाढत्या गैरवापरामुळे अनेक संसार उध्वस्त होत असून पुरुषांच्या आत्महत्या देखील वाढत आहेत. त्यात आता सोशल मीडियाच्या उत्क्रांती आणि स्वराचारमुळे काही महिला देखील याला अपवाद आहेत. म्हणूनच कुटुंब संस्था वाचणे आणि विवाह व्यवस्था टिकवण्यासाठी फॅमिली वेलफेअर रिसर्च अँड ट्रेनिंग सोसायटी तर्फे लवकरच परीवार कल्याण परिषद पुण्यात आयोजित केली जाणार असल्याचे संस्थेचे संस्थापक – सचिव – ॲड. संतोष शिंदे, यांनी जाहीर केले आहे.
फॅमिली वेलफेअर रिसर्च अँड ट्रेनिंग सोसायटी तर्फे परिवाराच्या कल्याणासाठी तसेच कुटुंब संस्था टिकवणे आणि विवाह व्यवस्था वाचनासाठी तसेच कुटुंबातील वयोवृध्द आणि लहान मुलांची फरफट थांबण्यासाठी परीवार आयोग होणे अत्यंत महत्वाचा आहे. गेल्या 2-3 दशकापासून पाहिले तर भा.दं.विधान कलम -४९८ अ, तसेच पोटगी कायदा आणि सध्याचा डोमेस्टिक व्हायलांस आणि अन्य कायद्याच्या गैरवापर मुळे कुटुंब संस्था धोक्यात आलेली आहे. या कायद्याच्या गैरवापरा मुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असून पुरुषांच्या आत्महत्या देखील जास्त प्रमाणात वाढल्या आहेत. महिलांसाठी महिला आयोग असून प्राण्यांसाठी, झाडांसाठी, कुत्रे मांजरासाठी आयोग आहे. पण पुरुषांसाठी आपल्या भारतात आयोग नाही. ही मोठी खंत आहे नव्हे तर राज्यघटनेतील समानतेच्या कलमांचे स्पष्टपणे उल्लंघन आहे. राजकारण्यांच्या मध्ये देखील या विषया बाबत उदासीनता आहे. केवळ महिला वोट बँक साठी 33 % आरक्षण मंजूर केले. आमचं म्हणणं आहे की 100 % का नाही केलं ? हा महिलांवर एक प्रकारे भेदाभेद करून एखादा पावाचा तुकडा टाकून शांत बसवण्यासारखे आहे. वास्तविक पाहता शासन / सरकारच स्त्री आणि
पुरुषांच्यामध्ये भेदाभेद करीत आहे. आणि म्हणूनच ही दरी कमी होण्यासाठी फॅमिली वेलफेअर रिसर्च अँड ट्रेनिंग सोसायटी भारतातील पहिली नोंदणीकृत अशी संस्था जी स्त्री आणि पुरुषच नव्हे तर घरातील वयोवृध्द तसेच समाजातील युवा वर्गाच्या विकास आणि संरक्षणासाठी कटिबध्द आहे.
भारतात परीवार आयोग त्वरित गठित व्हावा, कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे संरक्षण व्हावे, प्रत्येकाला समान न्याय मिळावा. आजची तरुण युवा पिढी देशाचे भविष्य असल्याने तरुणाईला शिक्षण व नोकरी – व्यवसाय मार्गदर्शन मिळावे तसेच कुटुंबातील वयोवृद्ध या जुन्या पिढीकडील संस्कारांचे जातन करून ते आजच्या पिढीपर्यंत पोहचविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा शिंदे, उपाध्यक्ष – तेजस नाईक, खजिनदार – जय अहिरे, सदस्य – पवन अंभोरे, सौ. ज्योतिबेन अहिरे, सौ. सविता शिंदे आणि संस्थापक – सचिव – ॲड संतोष शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीत पुण्यात लवकरच परीवार आयोग परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. सदर परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. त्यासाठी अधिक माहितीसाठी संपर्क क्र – 7507004606 यावर संपर्क करावा. तसेच जास्तीत जास्त लोकांनी फॅमिली वेलफेअर रिसर्च अँड ट्रेनिंग सोसायटी या संस्थेच्या कार्यात सदस्य व्हावे.