त्या गायीचे प्राण वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड
पावसामुळे पडला गोठा
हारंगुळ येथील प्रकार
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मुसळधार पावसात गोठा पडल्याने गोठ्या खाली रात्रभर दबून राहिलेल्या त्या गंभीर जखमी गायीचे प्राण वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी धडपड केली. सखाराम बोबडे पडेगावकर, रामेश्वर भोसले पाटील यांनी घेतलेल्या पुढाकाराने त्या गाईला प्राथमिक उपचार मिळाले.
हरंगुळ येथील बालाजी किशनराव कानडे यांचा नदीच्या पलीकडील बाजूस जनावराचा गोठा आहे. सोमवारी रात्री झालेल्या जोरदार वाऱ्यासह पावसात यांचा 6ते7 जनावरे बांधलेला गोठा जनावरांच्या अंगावर पडला. जनावरे गोठ्यात बांधलेली असल्याने जनावरे गोठा अंगावर पडलेला असताना रात्रभर पडत असलेल्या पावसात गोठ्याखाली दबून राहिली. ओढ्याला पूर आल्याने ते रात्री जनावरा कडे जाऊ शकले नाहीत .मंगळवारी सकाळी शेतकरी शेतात गेले असता गोठा पडलेला दिसून आला. त्यांनी तात्काळ शेजाऱ्यांना बोलावून अडकलेल्या जनावरांना बाहेर काढले. त्यातील बुधी नावाची गाय गंभीर जखमी झाल्याचे त्यांना सकाळी आढळून आले. त्यानंतर त्यांनी ही बाब परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या कानावर घातली. सखाराम बोबडे यांनी स्टेशन वडगाव येथील पशुवैद्यकीय विभागाचे डॉक्टर पोटभरे यांच्याशी संपर्क साधून त्या जखमी जनावरावर उपचार करण्याची विनंती केली. यावरून डॉ पोटभरे यांनी बुधवारी सकाळी आठ वाजता त्या गंभीर जखमी असलेल्या गाय व इतर जनावरांवर प्राथमिक उपचार केले. यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, रामेश्वर भोसले पाटील, लक्ष्मणराव देवकते ,सरपंच बिबन पठाण, ग्रामपंचायत सदस्य नीलेश बोडके आदींची उपस्थिती होती. घटनास्थळावरून सखाराम बोबडे यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना फोन करून या घटनेचा पंचनामा करत तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्याची विनंती केली.