आनंद माध्यमिक विद्यालय आनंदवन येथे प्रवेशोत्सव उत्साहात
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद माध्यमिक विद्यालय आनंदवन येथे शाळा प्रवेशोत्सव महोत्सव
मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापिका विद्या गोखरे ,शिक्षक प्रदीप कोहपरे ,स्मिता काळे,निशा येरणे, मयुर गोवारदिपे,आशिष येटे उपस्थित होते.
शाळा आरंभ दिनाच्या निमित्याने शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबवून व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तदनंतर आनंदवनातील निसर्गरम्य परिसरातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.प्रवेशित रॅलीत अक्षर कळे -संकट टळे ,एक-एक अक्षर शिकूया,ज्ञानाचा डोंगर चढुया,लिहा वाचा शिका,मग कसलाच नाही धोका, निरक्षर राहून अंधारात राहण्यापेक्षा,सुशिक्षित होऊन उजेडात राहणे कधीही योग्य या विद्यार्थ्याच्या घोषवाक्यांनी आनंदवन परिसर दुमदुमला होता.शेवटी प्रवेशोत्सव रॅलीचा समारोप शाळेत करण्यात आला.