ताज्या घडामोडी

वादग्रस्त विधान करून जाती जातीत भांडण लावून जातीय तेढ निर्माण करू नये नितीन देशमुख यांचा इशारा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी पाथरी परभणी

आ. गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भाष्य करतांना जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य करून जाती जातीत भांडणे लावू नयेत असा इशारा मराठा सेवा मंडळ संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी दिला आहे. त्यांचे बोलवते धनी कोण आहेत याचीही समजाला कल्पना असल्याचे नितीन देशमुख यांनी म्हटले आहे की, मराठा समाजाच्या हक्काची लढाई महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून चालू आहे. उपेक्षित वंचित समाजाला न्याय मिळायला हवा, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा ही या मराठा आरक्षणाच्या लढ्यामागे आहे. हे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील वारंवार सांगतात. तरीही आ. गोपीचंद पडळकर हे फक्त राजकीय अभिनिवेश बाळगून जरागे पाटील आणि एकूणच मराठा समाजाच्या विद्यमान आंदोलनाविषयी बोलत आहेत. पडळकर यांचा या मागचा बोलविता धनी कोण? या विषयी मराठा समाज चांगलाच
जाणून आहे.


त्यामुळे त्यांनी राजकीय हेतू बाजूला ठेवून या समाजाला कसा न्याय देता येईल ते पहावे, आपल्या ग्रामदैवताची खोटी शपथ घेणाऱ्या आ. गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वावर आरोप करण्यापेक्षा स्वतः आत्मचिंतन करावे आपण आपल्या जातीला न्याय देऊ शकलो नाही उलट त्यावर राजकीय पोळी भाजून आमदारकी भोगली.
सत्ता पद मिळविले. याउलट मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले आहे मी कधीही राजकारणात जाणार नाही.राजकारणापासून दूर राहणार माझ्या समाजाला आरक्षण मिळावे ही माझी प्रामाणिक अपेक्षा आहे तीही लढाई लढताना मी कोणत्याही राजकीय पक्षांना व्यक्तींना सोबत घेऊन नव्हे तर सर्वसामान्य गोरगरीब मराठ्यांना सोबत घेऊन ही आरक्षणाची लढाई लढणार आहे कारण आरक्षण हे माझ्या गरीब मराठ्यांना पाहिजे. त्यासाठी ते महाराष्ट्रात दौरे करत असताना ज्या ज्या ठिकाणी थोर पुरुषांचे स्मारक असतील, पुतळे असतील त्या त्या स्मारकांना अभिवादन करत त्यांचे विचार आत्मसात करत मराठ्यांचा हा लढा लढत आहे. हे वास्तव लक्षात घेऊन गोपीचंद पडळकर यांनी बोलताना तरी आता आपल्या अकलेचे तारे तोडू नये अशी समज मराठा समाजाच्या वतीने
देत असल्याचे नितीन देशमुख यांनी इशारा देत म्हटले आहे. तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही वेळोवेळी जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण लढायला समर्थन दिले आहे. तसेच मराठा समाजाला योग्य रीत्या आरक्षण मिळवून देण्याचं काम मनोज जरांगे करताय असेही ते स्पष्टपणे बोलत आहेत. मराठा समाज त्याची न्याय हक्काची लढाई लढत असताना आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहोत असं अनेक दलित चळवळीतील नेते बोलत असताना गोपीचंद पडळकर यांना हे विधान करण्याचे कारण काय गोपीचंद पडळकर यांनी आत्तापर्यंत ओबीसी समाजाचा किती गैरवापर केला धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबत किती चुकीच्या पद्धतीने काम केले आहे हे आम्हाला सांगायची वेळ येऊ देऊ नये ज्या माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतः चा समाज दावणीला बांधला त्या माणसाने इतर कोणावर बोलण्याची हिम्मत करू नये मराठा समाज कुठल्याही जाती- धर्माला न दुखवता संविधानिक पद्धतीने आपल्या आरक्षणाची लढाई लढत आहेत त्याला साथ देता येत नसेल तर किमान विरोध करण्याचा घाडसही इतर नेत्यांनी करू नये असा इशारा मराठा सेवा मंडळ संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी दिला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close