मूरपार येथे पत्रावडी मशीनचे थाटात उद्घाटन

तालुका प्रतिनिधी:हेमंत बोरकर चिमुर
दि. 06/01/2026 ला मौजा मुरपार (तुकूम) येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत अन्नपूर्णा उत्पादक गट मुरपार यांचे द्वारे पर्यावरणपूरक उपक्रमाला चालना देणाऱ्या पत्रवाडी (पेपर प्लेट/वाटी) मशीनचे उद्घाटन आज मुरपार येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या मशीनमुळे प्लास्टिकला पर्याय मिळून स्थानिक महिलाना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी कु. अर्चना बोनसुले BMM, श्री. लोखंडे साहेब वनरक्षक, श्री. हेमचंद बोरकर प्रभाग समन्वयक, श्री. कैलास गेडाम पशु व्यवस्थापक, श्री. धुर्वे सर, वंदना गुडधे प्रभागसंघ अध्यक्षा, संगीता मेश्राम प्रभागसंघ सचिव, कल्पना बहादुरे, करिष्मा मेश्राम, सुवर्णा जीवतोडे यांच्या हस्ते फीत कापून मशीनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. पत्रवाडी उत्पादनामुळे स्वच्छता, आरोग्य आणि स्वावलंबन यांना हातभार लागेल, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे आयोजन अन्नपूर्णा उत्पादक गट यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रभागातील सर्व ग्रामसखी, ग्रामस्थ, उत्पादक गट सदस्या, महिला बचत गटाच्या सदस्य तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर मशीनमुळे कमी खर्चात दर्जेदार पत्रवाडी तयार होणार असून स्थानिक पातळीवर रोजगार व विक्रीची संधी निर्माण होणार आहे.
कार्यक्रमाचा समारोप उपस्थितांचे आभार सौ. स्वाती दोडके यांनी मानले.









