बाबासाहेबांच्या चळवळीशी आणि संविधानिक विचारांशी एकनिष्ठ राहणे हेच खरे अभिवादन -समतादूत प्रज्ञा राजूरवाडे


बार्टी येथे 6 डिसेंम्बर महापरिनिर्वाण दिन
तालुका प्रतिनिधी : ग्यानीवंत गेडाम वरोरा
ड्रा बाबासाहेब आंबेडकर यांनी तमाम शोषित जनतेच्या बंधमुक्तीसाठी अनेक आवाहने स्वीकारून भारतीय संविधान या देशाला अनमोल अशी देणगी दिली ज्यात सर्वांना समानतेची संधी आहे इथल्या तळागाळातील सर्वसामान्य माणसाला आत्मसन्मान, स्वाभिमान,विचार मांडण्याचे स्वतंत्र्य स्त्रीना हिंदू कोड बिल देऊन त्याना त्यांच्या सामर्थ्य ची जाणीव करून जगायला शिकवले शिक्षण,आर्थिक कृषीविषयक जलविषयक, विचार या भारत देशयाच्या उभारणी साठी दिले
आदर्श लोकशाही सिद्धांत दिला त्यात एक मत एक व्यक्ती एक मूल्य आहेत ही जरी राजकीय लोकशाही असली तरी त्यांचे रूपांतर सामाजिक ,आर्थिक लोकशाही मंध्ये व्हावे अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती तरच हा भारत देश प्रगती करेल त्यामुळे या देशाच्या विकासासाठी बाबासाहेबांनि दिलेले उदात्त सविधांनिक जीवनमूल्ये प्रत्येकानि मनात रुजवली पाहिजे बाबासाहेबांच्या चळवळी शी व सविधांनिक विचारांशी एकनिष्ठ राहून सर्वांनी त्यांच्या विचारांची जागृतीची ज्योत बनणे गरजेचे आहे हे च खरे बाबासाहेबांना अभिवादन ठरेल असे प्रतिपादन ड्रा बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी बार्टी आणि ग्रामपंचायत मालेवाडा येथे बाबासाहेबांना अभिवादन या संयुक्त कार्यक्रम निमित्ताने आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या या कार्यक्रमाचे अद्यक्ष ग्रामपंचायत सदस्य प्रमोद जीवतोडे ग्रामपंचायत सदस्य वर्षा दोडके ,इंद्रकला दडमल शारदा मेश्राम, जगदीश रामटेके माजी सरपंच पल्लवी शेंडे, राशिका चौधरी, कविता पाटील , स्वप्नील वंजारी प्रवीण दुमाणे, मुंडरे, आदि मान्यवर उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे संचालन ललिता वरखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रशिका चौधरी यांनी केले