ताज्या घडामोडी

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुणालय येथे प्रधानमंत्री जनधन मेडिकल, कॅन्टीन, बाथरूम, डॉक्टर निरो सर्जन, तात्काळ उपलब्ध करून द्या – नुमान चाऊस

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

सविस्तर वृत्त असे की, स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय दवाखाना येथे संपूर्ण मराठवाड्यातून रुग्ण ईलाजासाठी येथे येतात. त्यापैकी अनेक रुग्णांना इथे मुक्कामी राहावा लागत. परंतु इथे केवळ रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांसाठी केवळ एक-एकच बाथरूम, टॉयलेट, कॅन्टीन, पिण्याचे पाणी चा स्टॉल आहे, जनधन मेडिकल सुद्धा एकच आहे इथे असणाऱ्या रुग्णांसाठी व त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांसाठी हे अपुरे आहेत. रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना टॉयलेट व बाथरूम वापरण्यासाठी थांबावा लागत आहे तसेच कॅन्टीनमध्ये बसण्यासाठी जागा अपुरी पडते. या सर्व गैरसोय लक्षात घेता मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हा अध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय दवाखाना येथे भेट दिली असता दवाखान्याचे डीन डॉक्टर भास्कर खैरे यांना निवेदन देऊन दवाखान्यात न्यूरो सर्जन उपलब्ध करून देण्याच्या मागणीसह वरील उल्लेखित सर्व गैरसोयी लक्षात आणून दिली व टॉयलेट, बाथरूम, कॅन्टीन, पिण्याचे पाणी चे स्टॉल्स वाढवून उपलब्ध करून द्यावे ही मागणी केली. तसेच अजून एक प्रधानमंत्री जनधन मेडिकल सुरू करण्यात यावी व त्याद्वारे दिल्या जाणाऱ्या औषधांवर 50% सूट देण्यात यावी ही मागणी निवेदनाद्वारे केली. हा निवेदन देताना मौलाना आझाद युवा मंच जिल्हा अध्यक्ष नुमान अली चाऊस यांच्यासह युवा नेते बाळासाहेब आसाराम घुमरे व आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close