ताज्या घडामोडी
दोन रेती व्यावसायिकांनी दिली पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी

चिमूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल .

उप संपादक:विशाल इन्दोरकर
चिमूर तालुक्यात अवैध रेती वाहतूक संदर्भात शोषल मीडियावर थोडक्यात मजकूर व रेती तस्करीचे फोटो पोस्ट केल्याने दोन रेती व्यावसायिकांनी पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी दिल्याने रेती व्यावसायिक विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे,
दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान चिमूर शहरातील जुना बस स्टॉप येथे रेती व्यवसायिक भूषण सातपुते व गोलू भरडकर यांनी पांढरया रंगाच्या सिवफ्ट गाडीने येऊन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार पत्रकार विलास मोहिंनकर यांनी चिमूर पोलीस स्टेशन ला दिली असून पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास चिमूर पोलीस.करीत आहे