अखिल भारतीय रजका संघम च्या राष्ट्रिय उपाध्यक्ष पदी पुण्याचे ॲड. संतोष शिंदे यांची नियुक्ती
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
राष्ट्रीय स्वच्छतेचे जनक श्री संत गाडगे महाराज यांच्या जयंती दिनी अखिल भारतीय रजका संघम चे राष्ट्रिय अध्यक्ष श्री.मोग्गा अनिलकुमार रजक व अन्य पदाधिकारी यांनी काल हैद्राबाद मधिल बैठकीत पुण्याचे ऍड. संतोष शिंदे यांची राष्ट्रिय उपाध्यक्ष पदी निवड करून जाहीर केले. श्री. शिंदे यांची नियुक्ती म्हणजे 23 फेब्रुवार श्री संत गाडगे महाराजांच्या जयंती दिनी ऍड. संतोष शिंदे यांना मोठा सन्मान मिळाल्याने फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर संपुर्ण भारतातून त्यांस शुभेछा देण्यात आल्या. संत श्री गाडगे महाराजांचे उपदेश फक्त रजक समाजासाठी नव्हे तर सर्व भारतवासीयांच्या करीता महत्वपूर्ण आणि लाखमोलाचे असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही त्यांस आपले गुरू मानले होते. पशुहत्या, अंधश्रद्धा, दारूबंदी करून मुलांना चांगले शिक्षण द्यावे, त्यांस शिक्षित करून देशाचा सजग नागरीक बनवावे, हुंडा बंदी समाप्त करून समाज शिक्षित झाला तर आपल्या देशाचे नाव विश्वात होईल यासाठी गाडगे बाबांनी मोलाचे संदेश देवुन स्वतः हातात झाडू घेवुन स्वच्छतेचे कार्य सुरू केले व संपुर्ण जगाला मोलाचे विचार आणि स्वच्छतेचा मंत्र दिला. अखिल भारतीय रजका संघम भारतातील सर्व धोबी / रजक समाजाला एका छताखाली म्हणजे शेड्युल कास्ट च्या sc ( schedule cast आरक्षण ) च्या एक क्यटेगरी मध्ये आणण्यासाठी कार्यरत असून तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या मा. मुख्यमंत्री यांनी देखील संघाला सहकार्य केले आहे.
यावेळी भारतातील सर्व धोबी / रजक समाजाने तसेच सर्व रजक संघटनांनी एकत्र येवून sc च्या आरक्षणाची की लढाई एक होवून लढण्यासाठी नवनियुक्त राष्ट्रिय उपाध्यक्ष ऍड.संतोष शिंदे यांनी मोबा नं- 7507004606 देवुन सम्पर्क करण्याचे आवाहन केले आहे.