रानडुक्कराच्या दहशतीमुळे शेतकरी संकटात
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे
चिमूूर तालुक्यातील अनेक गावातील शेत शिवारामध्ये रानडुकरांनी हैदोस घातला असून धान व कापूस पिकाची नासधुस करुन पीक उद्ध्वस्त करायला सुरवात केली आहे. आधी पावसामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. हाती येणारे पीक जाणार की काय अशी भिती शेतकऱ्यांना लागली आहे. परिसरात धानाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. तसेच कापूस,सोयाबीनचे पीक घेतले जाते. यावर्षी चांगले पीक आले आहे परंतु, काही शेतकऱ्यांच्या पिकाची परतीच्या पावसाने नुकसान झाली आहे त्यातच रानडुकराने हैदोस घालणे सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे.रानडुकरांकडून धान पिकाची नासधुस केली जात आहे.कापसाला बोंड आले परंतु सर्व नवीन बोडावर रानडुक्करांनी ताव मारला असून वनविभागाने रानडुक्कर मारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.