नेरी येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
दि. 13 जाने. 2024 धनश्री नागरी सहकारी पतसंस्था नेरी येथे वि. हिं.प.मंत्री आनंद चौखे, सहकार भारती जिल्हा संघटन मंत्री प्रभाकर पाकमोडे व कारसेवक डॉ. हटवादे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली .अयोध्या अक्षदा व पत्रक वितरण कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये प्रमुख उपस्थिती नेरी शहरातील सर्व मंदिरातील अध्यक्ष व प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
22.जाने.2024 ला अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा उद्घाटन सोहळा निमित्त आपल्या शहरातील मंदिरामध्ये स्वच्छता करून रांगोळी घालून मंदिर सजवून भजन, पूजन ,कीर्तन व दीपोत्सव साजरा करून आनंदोत्सव साजरा करावा या विषयावर चर्चा करण्यात आली. सर्वाचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले. त्यामध्ये पंढरीनाथ देवस्थानचे अध्यक्ष मंगेश चांदेकर, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष दादाराव पिसे, शंकरजी देवस्थान चे अध्यक्ष रूपचंद चौधरी ,जगन्नाथ बाबा मंदिर चे अध्यक्ष अशोक लांजेकर ,श्रीराम मंदिर चे प्रमुख रवीजी पिसे, पार्वती माता मंदिर चे प्रमुख विलास पिसे यांची उपस्थिती होती.सोबत विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड सत्संग प्रमुख जगदीश बारसागडे व बजरंग दल संयोजक शुभम उपरकार होते.