चिमुर नगर परिषद रोजनदारी कर्मचाऱ्यांना नोकरित सामाऊंन घ्या
विधानसभा संपर्क प्रमुखामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले निवेदन.
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे
चिमुर येथील नगर परिषद रोजनदारी कर्मचार्याना नोकरित सामाऊन घेणेबाबत दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी नगर परिषद रोजनदारी कामगार व शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभा संपर्क प्रमुख संजय काले यांना जिल्हा प्रमुख नितिन मत्ते यांच्या उपस्थितीत देण्यात आले,
चिमुर ग्रामपंचायतचे रूपांतर चिमुर नगर परिषद मध्ये झाले असून ग्राम पंचायत काळापासुनच सफाई मजूर रोजनदारी मजूरिने काम करीत आहेत, नगर परिषद ने वेतन वाढीसंदर्भात ठराव पास करुण सुद्धा नगर परिषद ने वेतन वाढ दिली नसून 15 ते 20 वर्षापासून रोजनदारी वर काम करत असतांना सुद्धा नगर परिषद मध्ये नियमित कर्मचारी म्हणून सामाऊन घेतले नाहीत त्यामुळे नियमित सेवेत असलेले सर्व रोजनदारी कर्मचारी आर्थिक संकटात आहेत, भविष्यात जर नियमित कर्मचारी म्हणून सामाऊन घेतले नाही तर मजूरांचे भविष्य आधारमय होईल या आश्याचे निवेदन मुख्यमंत्रयाना दिले आहे,
या वेळी माजी तालुका प्रमुख भाउराव ठोम्बरे, नानाभाऊ नंदनवार, सुधाकर निवटे, श्रीहरी सातपुते, किशोर उकुंडे, विनायक मुंगले, आशीष बगुलकर, विलास कांनझोड़े, भाऊराव गोहने, राम जामभुलकर, शिवाजी मेश्राम, सिद्धार्थ चहांदे, भीमराव रामटेके, पारस देवगड़े, राकेश बगुलकर, उपस्थित होते.