ताज्या घडामोडी

कृषिदुतांकडून शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळी नियंत्रण बाबत मार्गदर्शन

ग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्र कामडी नेरी

गीताई ह्युमनकाईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट, पुणे द्वारा संचालित, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला सलग्नित, कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय आमखेडा अंतर्गत ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत कृषिदुत पियुष ईश्वर रंदये याने गुलाबी बोंडअळी ला कसे नियंत्रित करावे याची माहिती दिली.
गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भावाची सुरवात प्रामुख्याने कापूस पीक उगवणींनंतर ४५ ते ५० दिवसांनंतर (पात्या, फुले लागण्याच्या अवस्थेत) होते.गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनेसाठी पाते फुले लागणाऱ्या अवस्थेपासून फेरोनोन (कामगंध) सापळ्यांचा उपयोग करावा. अंडी व्यवस्था , अळीची प्रथमावस्था व पतंग अवस्थेत गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. अळी बोंदमध्ये शिरल्यानंतर व्यवस्थापन करणे कठीण होते अशी माहिती कृषिदुत यांनी दिली.यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते.
या प्रात्यक्षिके साठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जि. वसू , प्रा. प्रदीप निचळ, कार्यक्रम समन्वयक प्रा.समाधान कव्हर कार्यक्रम अधिकारी तथा विषयतज्ञ प्राध्यापक डी.टी. बोरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close