ताज्या घडामोडी

दिर भावजयीत बहरलेल्या प्रेमाचा अंत दुःखद पैनगंगेच्या पुलावरून घेतली नदीत उडी

तालुका प्रतिनिधी :ग्यानीवंत गेडाम वरोरा

दीर-भावजयीच्या नात्यात प्रेमाचे नाते जुळले मात्र हे नाते समाज मान्य करत नसल्याचे पाहून त्या दोघांनी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव जवळच्या पैनगंगा नदी मध्ये आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला.
वरोरा तालुक्यातील बांद्रा येथील हेमंत चिंचोळकर असे दिराचे तर सोनाली असे त्याच्या भावजय चे नाव आहे. हेमंत अविवाहित आहे तर सोनाली ला दोन मुली आहेत. दोघांमध्ये प्रेम जुडले. पुढील आयुष्य आता दोघांनी एकत्रितपणे घालविण्याचा निर्णय घेतला त्यासाठी महिनाभरापूर्वी दोघेही घरून निघून गेले होते. मात्र त्या दोघांना त्याच्या नात्यातील दीर-भावजयीच्या नात्याची आठवण करून देण्यात आली व परत आणण्यात आले. तथापि फार काळ ते वेगळे राहू शकले नाहीत. अखेर काही दिवसांनी त्या दोघांनी घर सोडले सोनाली चे माहेर भद्रावती तालुक्यातील असल्याने 2 ऑगस्टला ती बेपत्ता झाल्याची तक्रार भद्रावती पोलिसांना देण्यात आली तर हेमंत बेपत्ता झाल्याची तक्रार वरोरा तालुक्यातील शेगाव पोलिसात देण्यात आली. अशातच या दोघांनी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव नजीकच्या पैनगंगा नदी मध्ये आत्महत्या केली. पुलावर हेमंत व सोनाली चे आधार कार्ड,पर्स व चप्पल आढळली. यावरून त्यांनी आत्महत्या केल्याचे मानले जात आहे. याबाबत महागाव पोलिसांनी याची माहिती शेगाव पोलिस स्टेशनला दिली अशा प्रकारे दीर-भावजयीच्या प्रेमाचा अंत दुःखद झाला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close