ताज्या घडामोडी

प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील कंत्राटी वाहनचालक व सफाईगार कर्मचाऱ्यांचे १८ महिण्यांपासून थकीत असलेले मानधन मिळवून द्या..!!

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे कंत्राटी वाहनचालक व सफाईगार यांची निवेदनातून मागणी..!!

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

जि.प. अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील कंत्राटी वाहन चालक व सफाईगारांचे १८ महिण्यांपासून थकीत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. सदर बाब आपल्या स्तरावर सोडवून थकीत असलेले मानधन मिळवून दयावी अशी मागणी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे कंत्राटी वाहनचालक व सफाईगार यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
जि.प. अरोग्य विभागामार्फत १६ नोव्हेंबर २०१९ ते ३० जुन २०२० या कालावधीत मानव सेवा बहुउद्देशिय बेरोजगार सहाकरी संस्था नागपूर यांच्याकडे कंत्राट देण्यात आले व त्यानंतर २ जुलै २०२० ते आजतागायत रयत स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लि. नाशिक यांना कंत्राट देण्यात आले असून सदर संस्थेच्या वतीने नियुक्ती देण्यात आली. तसेच काम कोरोनाच्या काळात व आजतागायत आपले काम जबाबदारीने मुख्यालयी राहुन रुरण सेवा करीत असुनही वेळेवर मानधन मिळत नसल्याने उपसमारीची वेळ कंत्राटी वाहनचालक व सफाईगारांवर आलेली आहे.
तसेच वाहन चालक यांचे मासिक मानधन १९६६४ रुपये एवढे व सफाईगार यांचे मासिक मानधन १५४९३ रुपये एवढे असुन वाहन चालकास १०७०० रुपये व सफाईगार यांना ८५९५ रुपये इतके मानधन देल्या जात आहे. एवढे कमी मानधन मिळत असतांनासुध्दा मागिल १८ महिन्यापासून मानधन न मिळाल्याने वारंवार कंत्राटदार संस्थेला तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या संबंधित विभागाला विचारण केली असता कुठलेही समाधानकारक उत्तर मिळालेली नाही. सदर बाबीकडे व्यक्तीगत लक्ष देवून थकीत असलेले १८ महिन्यांचे मानधन मिळवून देण्यास मदत करावी. त्याचप्रमाणे होणारी पिळवणूक लक्षात घेता बाहयस्त्रोत संस्थेव्दारे नियुक्ती न देता आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली अथवा एनआरएचएम मध्ये कंत्राटी पध्दतीने थेट नियुक्ती देण्यात यावी. ज्यामुळे मासिक मानधन वेळेत मिळेल व तसेच आपच्या कुटुंबावर उपासमारिची वेळ येणार नाही अशी मागणी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे सर्व कंत्राटी वानचालक व सफाईगार यांनी निवेदनातून केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close