माजी विद्यार्थी समिती कडुन प्रमोद नागापुरे यांचा सत्कार
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
नुकत्याच झालेल्या गोंडवाना विद्यापीठाचा वर्धापन दिनानिमित्त आनंद निकेतन महाविद्यालयातील, प्राणीशास्त्र विभागातील प्रयोगशाळा परिचय श्री. प्रमोद नागापुरे यांचा सर्वकृष्ट कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला त्यालाच अनुसरून नागभीड येथील गो.वा.महाविद्यालयात 20 नोव्हेंबरला होणाऱ्या माजी विद्यार्थी मेळावा आढावा सभा दरम्यान श्री. प्रमोद नागापुरे यांना गोंडवाना विद्यापीठाचा सर्वोकृष्ट कर्मचारी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल. माजी विद्यार्थी समिती तर्फे त्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. प्रमोद नागापुरे हे मुळचे कोटगांव ता. नागभीड जि. चंद्रपुर येथील रहीवासी आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे गोविंदराव वारजुकर महाविद्यालय येथे झाले. सन १९९९ — २००२ या काळात त्यांचे शिक्षण झाले.
हाटेल विजय येथे हा सत्कार समारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज भेंडारकर , निलकंठ ठाकरे यांनी अथक परीश्रम केले.