उद्घघाटनापुर्वीच आरोग्य केंद्राच्या इमारतीला गेले तडे
सावरी (बिड) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे
प्रहार सेवक विनोद उमरे याच्या आरोप
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
सावरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची जुनी इमारत जीर्ण झाली असून, त्या करिता करोडो रुपये खर्चून नविन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. पण बांधकाम करण्यात आलेल्या करोडो रुपयांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम निकुष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याचा आरोप प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केला आहे.
नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे. नागरिकांना चांगल्या दर्जाचे औषोधोपचार व्हावे. याकरिता सावरी येथे करोडो रुपये खर्च करून सुसज्य अशी प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत बांधण्यात आली. मात्र उद्घघाटनाच्या पूर्वीच आरोग्य केंद्राच्या इमारतीला तडे गेले आहेत. आरोग्य केंद्राचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असुन, आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाकडे लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाने या बांधकामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून, या बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे असा प्रश्न प्रहार सेवक विनोद उमरे यांनी व त्याचे सहयोगी मुरलीधर रामटेके, सचिन घानोडे, नारायण निखाडे, नारायण मत्ते, मिलिंद खोब्रागडे, रमेश वाकडे, निरंजन वाकडे, यांनी उपस्थित केला आहे.