अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या कामात अडथळा न करता, नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन काम करावे खा.नेते

अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
भामरागड:- गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे मा. खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली भामरागड येथील शासकीय विश्राम सभागृहात तालुक्यातील विविध विभागाच्या प्रशासकिय अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी मा.खासदार महोदयांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी विविध महत्वपूर्ण विषयांसंदर्भात सविस्तर चर्चा करून आढावा घेतला आणि मार्गदर्शक सूचना दिल्या.

या आढावा बैठकीला खासदार अशोक नेते यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामाचा समाचार घेऊन,सुचना देत नागरिकांच्या कामात हयगय,अडथळा न करता त्यांच्या समस्या जाणून घेऊन,काम करावे.शासनाचे विकास काम असो किंवा शासनाच्या विविध कोणत्याही योजना असो यात दुर्लक्ष न करता अधिकाऱ्यानी कामे करावे,(MSEB) विद्युत महावितरण अधिकारी यांना निर्देश देत भामरागड हा अतिदुर्गम भाग असुन ग्रामिण भागात आपण लाईट बिल ची रिडींग न घेता सरसकट भरमसाठ लाईट बिल दिले जाते हि बाब निदर्शनास आली आपण अधिकारी वर्गानी सतर्कता बाळगावी.आता यानंतर असे कुठल्याही प्रकारचे प्रकरण निदर्शनास आल्यास आपणांस जबाबदार ठरविले जाऊन कार्यवाही नोटीस देण्यात येईल.आशा सुचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जे अधिकारी वर्ग कामचुकारपणा करतात त्यांची गय केली जाणार नाही,अशा सुचना अधिकाऱ्यांना खासदार अशोक नेते यांनी दिले.
याप्रसंगी कृषी अधिकारी,आरोग्य औअधिकारी, वनविभाग अधिकारी,(एम.एस.ई बी )विद्युत महावितरण अधिकारी,पोलीस विभाग,बँक अधिकारी, महसुल विभाग, पाणी पुरवठा, सिंचाई,ग्रामसेवक असे विविध विभागाच्या अधिकाऱ्यांचा आढावा घेतला.
या बैठकीला प्रामुख्याने मा. तहसिलदार पि.आर.पुप्पालवार, (बिडीओ) विस्तार अधिकारी स्वप्नील मगदुम,जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, प्रकोष्ठ सहकार जिल्हा अध्यक्ष आशिष पिपरे,प्रकल्प अधिकारी प्रतिनिधी करपते, ता.कृषि. अधिकारी एम.एल. भावे,गटशिक्षणाधिकारी जनार्दन वडलाकोंडा,विद्युत महावितरण अधिकारी रोशन मानकर, महावितरण उपविभाग शशिकांत ढोले, पाणी पुरवठा अधिकारी अमोल रामटेके, महाराष्ट्र बँकचे अधिकारी प्रेम किनाके, नगराध्यक्षा रामबाई महाका (हलदार )भामरागड चे भाजपा नेते तथा ,स्वीकृत नगरसेवक सुनिल बिशवास, शहराध्यक्ष सम्राट मलिक, तपेश हलदार, माजी नगरसेवक प्रा.चालुरकर, दलसु सळमेक, दिलिप उईके,व इतर सर्व विभागाचे अधिकारी आणि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.