गंगाखेड मल्टीस्टेट मधील “धनलक्ष्मी सोने खरेदी कर्ज” योजनेस उदंड प्रतिसाद
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
आजच्या महागाईच्या काळात सामान्य जनतेस सोने खरेदी करणे अवघड झाले आहे. सोन्याने तर पन्नाशी गाठली आहे व दिवाळीत तर पन्नाशी पार करून साठीकडे जाण्याचे संकेत आहेत संस्थेने आजपर्यंत सर्व थरातील लोकांना व सर्व प्रकारची कर्जे वाटप केले असून ‘न भूतो न भविष्यती अशी धनलक्ष्मी सोने खरेदी कर्ज योजना काढली व सामान्यासाठी सोने खरेदीची एक नवी संधी दिली आहे. यामध्ये अडीच गोळ्या पर्यंत सोने खरेदी करणे शक्य होणार आहे.
या योजनेत सभासदास फक्त खरेदी बिलाच्या 20 टक्के रक्कम भरून सोने खरेदी करता येईल.यासाठी कसलीही किचकट प्रक्रिया नसून खरेदीदारास फक्त सभासद असणे आवश्यक आहे. प्रथम येईल त्या संधीचा फायदा घेता येईल. संस्थेने ही योजना मर्यादित कालावधीसाठी जाहीर केली असून सभासदांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तरी जास्तीत जास्त सभासदांनी याचा फायदा घ्यावा असे संस्थेचे चेअरमन ऍड. मिलिंद क्षीरसागर यांच्यासह सर्व संचालक मंडळांनी कळविले आहे.