जिल्ह्यातील नर्सेस भगिनींचा सेवा विषयक प्रश्न निकाली काढावा
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना गडचिरोली जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदनातून मागणी.
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
गडचिरोली जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या नर्सेस भगिनी ग्रामीण, डोंगराळ, आदिवासी, दुर्गम नक्षलग्रस्त भागामध्ये अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता उत्तम प्रकारे कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडीत आहेत मात्र नर्सेस भगिनींच्या सेवाविषय प्रश्न दिर्घकाळ प्रलंबित असल्याने सदर सेवाविषयक प्रश्न जिल्हा स्तरावरून निकाली काढण्यात याव्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंध शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
सध्यास्थितीत कोवीड -१९ संसर्गजन्य साथरोग प्रतिबंधक कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुध्दा अतिशय कर्तव्य व परतत्वेने पार पाडीत आहे. परंतु काम करीत असतांना नर्सेस संवर्गाला अनेक समस्या निर्माण होत असून याबाबत नर्सेस संघटनेकडून वारंवार चर्चा निवेदन आंदोलन आमरण उपोषण करण्यात आले. त्या अनुषंगाने बरेचसे प्रश्न मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सोडविले. परंतु उर्वरित प्रलंबित प्रश्नाबाबत जिल्हा स्तरावर कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे नर्सेस भगिनींची कुचंबना होत असल्यामुळे नर्सेस भगिनींचे दिर्घकाळ प्रश्न जिल्हा स्तरावरून,प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावरून शिफारस करून सोडविण्यात यावे तसेच जिल्हा स्तरावरून, आपतकालीन परिस्थितीचा अपवाद वगळता सार्वजनिक सुट्टी किंवा साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कुटुंब कल्याण शिबीर, मेळावे व कोविड -१९ प्रतिबंधक लस कार्यक्रम राबविण्यात येवू नये, कोविड-१९ अंतर्गत लसीकरण मोहीमेचा निधी संदर्भीय संस्था स्तरावर वितरीत करण्याबाबतचे संदर्भीय कार्यालयीन पत्र क्र. आरोग्य/राष्ट्रीय आरोग्य अभियान/अनुदान वितरण/३६३९/२०२१ दिनांक ८ जुन २०२१ या पत्रानुसार राष्ट्रीय अभियान अंतर्गत कोवीड-१९ अंतर्गत प्रत्येक जिल्हयामध्ये लसीकरण मोहीम सुरू आहे. सदर लसीकरणाअंतर्गत प्रत्येक मध्ये निधी वितरीत करण्यात आले आहे.
असे विविध सेवाविषय प्रश्न जिल्हा स्तरावरून निकाली काढण्यात याव्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंध शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदनातून करण्यात आली आहे.