अतीव्रष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून,शेतकऱ्याना सरसकट पीक-कर्जमाफी आणी नुकसान भरपाई द्या ……डॉ.जितीन वंजारे
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
महाराष्ट्र हा देशातील सर्व राज्यांना सर्वच गोष्टीत पुरून उरणारा राज्य आहे ,सुजलाम सुफलाम अशी एकेकाळी ओळख असणाऱ्या याच महाराष्ट्राला राजकारन्याची काळी नजर पडली आणी राज्य लयास जाताना आम्ही बघतो आहोत.हाच महाराष्ट्र आहे जो संकटकाळी साऱ्या जगाला मदत करतो पण आज काल याच महाराष्ट्राला मदतीची गरज आहे .आज महाराष्ट्रात चोहीकडे अतीव्रष्टी चे सावट आहे.अती पावसामुले अक्षरशः सर्व पिके शेतातच सडून गेली आहेत .पिकांना कर उगली आहेत .हाच महाराष्ट्र कधी पावसाअभावी दुष्काळी ठरतो तर कधी अतीव्रष्टी मुळे कोलमडतो ही दूरदर्शा पाहवत नाही याला जबाबदार कोण आणी कस ते आज आपण सविस्तर पाहू.
कालपरवा पाऊस झाला तो पण मुसळधार सलग तीन दिवस झालेत सतत पाऊस पडतो आहे यात सर्व पिके नासून जळून गेली आहेत .याला जबाबदार जरी निसर्ग असला तरी आपला देश कृषीप्रधान आहे मग यात शेतकरी हा या देशाचा केंद्रबिंदू असला पाहिजे पण तस होताना दिसत नाही .सरकार कोणतेही येऊ फक्त विपक्ष असतानाच त्यांना शेतकऱ्याचा पुळका येतो बाकी इलेक्शन आले की कर्जमाफी देऊन सत्तेत जाने आणी नंतर ना हमीभाव ना कुठली मदत.आता काल परवा झालेले मुख्यमंत्री बीजेपी सरकार असताना विना पंचनामा सरसकट कर्जमाफी द्या असं घसा ओरडून सांगणारे उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री आहेत आज ते सांगतात की डिजिटल मोबाईल वर अँप डाउनलोड करून पंचनाने करा असे सांगतात मग मला यांच्या नैतिकतेवर सवाल पडतो आणी आपसूकच हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुत्र सन्माननीय उद्धव ठाकरे हे सत्तेत नसताना शेतकऱ्यांचे कैवारी होते ते सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचे वैरी झाले की काय ? असा खणखणीत सवाल शेतकरी नेते व सामाजिक कार्यकर्ते मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केला आहे.
महामानव बोधीसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराणी भारताच्या काही नद्या एकत्र जोडल्या तर भारत देश सुजलाम सुफलाम होईल अशी संकल्पना मांडली होती.नद्या जोड प्रकल्प ही संकल्पना त्यांच्या सुपीक डोक्यातून बाहेर आली खरी पण त्याकाळी आणी आजही ती अमलात आणताना एकही सरकार पुढे येताना दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेबानी शेती व शेतकरी यावर खूप मोठे लिखाण केले आहे ते जर अमलात आणले तर मी सांगतो देशातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही .ते कस आपण पाहुयात.महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेती आणी तंत्रज्ञान यावर मोर्चा वळवला यामध्ये सखोल अभ्यास केला आणी त्यांनी त्रिसूत्री तयार केली यामध्ये त्यांनी सांगितले की शेती ही आत्याधुनिक पद्धतीने करावी पारंपारिक शेती करू नये ,शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून सुधारित औजारे वापरावीत आणी शेती सुधारित पद्धतीने करावी. दुसर म्हणजे जमिनीचे तुकडे एकत्र करून एकत्रिकरणं करून ती मोठ्या प्रमाणावर केली गेली पाहिजे आणी तिसर म्हणजे शेतीला लागणारे बी-बियाणे खते दर्जेदार दिली पाहिजेत आणी त्यासाठी लागणारा अग्रीम खर्च शासनाने करायला पाहिजे.एखाद्या व्यवसायासारखी शेतीत गुंतवणूक वाढवली पाहिजे आणी शेती साठी लागणारा खर्च सरकार ने उचलायला पाहिजे.हे सर्व डॉक्टर बाबासाहेबानी 1944 साली लिहून ठेवलय पण अजूनही तेलंगणा हे राज्य सोडता एकही राज्याने हे अमलात आणल नाही .हीच खरी शोकांतिका.मग सवाल पडतो तो भारताला कृषीप्रधान देश म्हणायचं की नाही.आपली राज्यघटना ही जगातील सर्वात सुंदर राज्यघटना आहे पण ती अमलात आणणारी लोक सत्ताधारी बरोबर नाहीत आणी त्याची फळे आपण सगळे भोगतो आहोत .डॉक्टर बाबासाहेबानी राज्यघटना लिहिताना मुख्य तीन निकष काढले एक आर्थिक स्वातंत्र्य दुसरा सामाजिक स्वातंत्र्य आणी तिसरा राजकीयहिंदू कोड बिल .यामध्ये बाबासाहेब म्हणतात देशातील सर्व जमीन ,पैसा आणी सोने नाणे सर्व संपत्ती चे शासकीकरण करा आणी ती समसमान वाटप करा आणी ज्याच्यात हिम्मत असेल तो श्रीमंत होईल आणी यालाच आर्थिक स्वातंत्र्य म्हणायचे .दुसर सामाजिक स्वातंत्र्य म्हणजे एकदा का समसमान संपत्ती ची वाटप झाली की नंतर कागदावर कोणीही जात लिहायची नाही सर्वजण सम-समान आहेत ,कोणी उच्च कोणी नीच नाही.आणी तिसर म्हणजे हिंदू कोड बिल यात महामानव लिहितात स्त्रीपुरुष समानता,पुरुषांप्रमाणे स्रियाना समसमान अधिकार द्या त्यांना समान भागीदारी द्या .पण येथील मनुवादी विकृती ने आजतागायत ते अमान्य केल आणी देशाचे वाटोळं केल.आणी म्ह्णून मी भीमरत्न मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर एक आंबेडकरी चळवळीतील खंबीर कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्र आणी केंद्र शासनाला चॅलेंज करतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच खरं साहित्य पाठयपुस्तकात उतरावा देशातील नवतरुणांना ते वाचायला द्या बाबासाहेबांचे सर्व साहित्य प्रकाशित करा त्यांचे सर्व खंड प्रकाशित करा लपून ठेऊ नका .ते वाचल्यावर प्रत्येकजण संविधानाचा सखोल अभ्यास करील आणी या राजकारन्याना खडा सवाल करील की काय योग्य आणी काय अयोग्य आहे हे सांगेल .पण ही सुशिक्षितता येऊच द्यायची नाही.आणी म्हणून भारतात बुद्ध आणी महामानव विश्वरत्न बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लपून ठेवले जातात.त्यांचा ज्ञान झाकून ठेवलं जातं.कारण हे ज्ञान वाघीनीचे दूध आहे ते प्याल्यावर प्रत्येक जण गुरगुरल्या शिवाय रहाणार नाही हे नक्कीच आहे.
देशातील एकूण परिस्थिती पाहता सध्याच केंद्र सरकार कृषी कायदे हे बिझनेसमन च्या हिताचे करत आहे हे सुटबुटाच्या लोकांची चाकरी करणार सरकार आहे कारण शेतात हिरवी सोयाबीन असताना तिला 11000 रुपये भाव आणी सोयाबीन तयार झालं की 5000 रुपये भाव म्हणजे दुसऱ्या देशातून आयात करताना जास्तीचा भाव आणी येथील शेतकऱ्यांचा माल आला की कमी भाव म्हणजे शेतकरी विरोधी सरकार आहे हे यावरून सिद्ध होतय.शेतकऱ्यांवर नुकसान भरपाई किंवा कर्जमाफी द्यायची वेळच येऊ नये अश्या आशयाचे कृषी कायदे आणी कृषी बजेट असले पाहिजे.पण इथे विजय माल्या ,अदाणी ,अंबानी ,निरव मोदी सारख्याना लागेल तितक कर्ज दिले जाते वेळप्रसंगी त्यांना कर्जमाफी करून दुसऱ्या देशात पळवून लावले जाते पण कृषी प्रधान देशात बोटावर मोजनाऱ्या पैशासाठी अक्खी जमीन बँकेला गिरवि ठेवावी लागते हीच खरी शोकांतिका.आमचे चौकीदार पैसे खात नाहीत ते फकीर असले तरी अडीच लाखाच्या सुट साठी तुम्ही घोटाळे करा आणी मला कमिशन द्या म्हणजे हे असं झालं की चोराला राखन करत असलेल्या घरात चोरी करून द्यायची आणी नंतर त्यात हिस्सा मागून चोर पळवून लावायचे आणी म्हणायचं ‘मै चुकीदार हू ‘ अश्या चौकीदाराला योग्य वेळीच रोखा नसता घरात एकही वस्तू राहणार नाही हे नक्की.सध्या ची परिस्थिती महाराष्ट्र जी आहे त्यावर कर्जमाफी देणे आणी नुकसान भरपाई देणे हीच महाराष्ट्र आणी केंद्र सरकार ची नैतिक जबाबदारी आहे ती त्यांनी पार पाडावी एव्हढंच याप्रसंगी मी म्हणेन……..लेखन- शेतकरी नेते – मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर-9922541030