ताज्या घडामोडी

पशुवैद्यकीय दवाखाना विठ्ठलवाडा येथे जनावरांनासाठी चौखूरा रोग नियंत्रनासाठी लसीकरण सुरु

तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपिपरी

गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील पाळीव जनावरांना चौखूरा रोगाची लागण झाली .
त्यामुळे पशु वैद्यकीय दवाखाना विठ्ठलवाडा येथे चौखुरा रोग नियंत्रनासाठी शिबीराचे आयोजन करण्यात यावे या करिता दि.4 मार्च रोज शुक्रवारला ग्रामपंचायत विठ्ठलवाडा च्या पदाधिकार्यांनी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांना निवेदन दिले.
विठ्ठलवाडा गावात
पशुपालक वर्ग मोठ्या प्रमाणात असून गाय,बैल , म्हैस , शेळी, मेंढी या पाळीव जनावरांचे पालन येथील पशुपालक करित आहेत.
मागील काही दिवसापासून या पाळीव जनावरांना चौखूरा रोगाची लागण झाल्याने पशुपालक वर्ग वैतागला आहे. पशु वैद्यकीय दवाखान्यात जनावरांना उपचाराकरिता दाखल केले असता पुरेसा औषध साठा उपलब्ध राहत नसल्याचे येथील पशु वैद्यक सांगत असल्याने
जनावरावर उपचार करायचा कसा असा यक्ष प्रश्न येथील पशुपालकांना पडला असता त्यांनी सदर समस्या विठ्ठलवाडा ग्रामपंचायति पुढे मांडली.
लागलीच सरपंच अंकुर मल्लेलवार यांनी
दि.4 मार्च रोज शुक्रवारला विठ्ठलवाडा येथे जनावरांना लागण झालेल्या चौखुरा रोगाच्या निवारनासाठी शिबीराचे आयोजन करण्यात यावे या संदर्भात तालुका पशुवैद्यकीय अधिकारी गोंडपीपरी यांना निवेदन दिले.
दरम्यान आज दि.14 मार्च रोज सोमवारला पशु वैद्यकीय दवाखाना विट्ठलवाडा येथे पाळीव जनावरासाठी लसिकरन शिबीर सुरू करण्यात आले .
त्यामुळे विठ्ठलवाडा गावातील समस्त शेतकरी बांधवांनी आपली पाळीव जनावराना पशु वैद्यकीय दवाखान्यात आणून लस टोचून घ्यावी असे आव्हाहन विठ्ठलवाडा ग्रामपंचायत सरपंच अंकुर मल्लेलवार यांनी शेतकऱ्याना केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close