ताज्या घडामोडी

नेमडा येथे तलाव दुरुस्ती व कॅनल पाईप लाईन कामाचे जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन

जि.प.कडून सिंचाई विभागाला 15 लक्ष रु.निधी मंजूर

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद ग्राम पंचायत अंतर्गत नेमडा येथील तलाव दुरुस्ती व नवीन कॅनल पाईप लाईन जोळणी याकामासाठी गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत सिंचाई विभागाकडून 15 लक्ष रु. निधी मंजूर झाल्याने या कामाची भूमिपूजन मागील शनिवारी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पार पडला.
नेमडा येथील शेतकऱ्यांनी व आविस कार्यकर्त्यांनी तलाव दुरुस्ती व कॅनल पाईप लाईनसाठी निवेदन दिले.या निवेदनाची दखल घेत जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागाला अंदाजे 15 लक्ष रु.निधी उपलब्ध करून दिल्याने या कामाप्रति शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
नेमडा येथील तलाव दुरुस्ती कामाचे भूमिपूजनप्रसंगी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचे सोबत आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगम,सरपंच बापू सडमेक,उपसरपंच तिरूपती दुर्गम,सरपंच अजय आत्राम,सरपंच लक्ष्मण गावडे,आविस नेते सुधाकर पेद्दी,विजय रेपालवार,वाईल तिरूपती,आविस सल्लागार रवी सल्लम,जुलेख शेख,नारायण मूडमडगेला,साई मंदा, किरण वेमुला,गणेश रचावार,श्रीनिवास राऊत आदी उपस्तीत होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close