धान खरेदी योजनेतील हिशोब अंतिम करणे बाबतची सूचना

प्रतिनिधी: नरेंद्र मेश्राम लाखनी
भंडारा धान खरेदी कामकाज संबंधित असणाऱ्या सर्व सहकारी संस्था व गोदाम मालक तसेच राईस मिल धारकांना आधारभूत किंमत खरेदी योजना पणन हंगाम 2015 -16 ते 2018- 19 या कालावधीतील भंडारा जिल्ह्यात खरेदी केलेल्या धानाची धान्य साठवणूक गोदाम भाडे बिल प्रस्ताव, तसेच धान भरडाईचे वाहतूक देयके बिल ज्या मिलधारकांकडून अथवा गोदाम धारकांकडून अद्याप पर्यंत सादर करण्यात आले नाही. त्यांनी 21 डिसेंबर 2021 पर्यत जिल्हा पणन अधिकारी कार्यालयास सादर करावे.
केंद्र व राज्य शासनाकडून हंगाम 2015 -16 ते 2018 -2019 या कालावधीतील अंतिम हिशोब करून योजने अंतर्गत येणाऱ्या खर्चाची रुजु करण्याकरता 25 डिसेंबर ही अंतिम मुदत आहे.
सर्व प्रकारचे गोदाम भाडे ,बिलप्रस्ताव यापूर्वीच सादर करणे आवश्यक आहे. तरीदेखील या सर्व संबंधितांनी 21 डिसेंबरपूर्वी बिलांची पूर्तता करावी अ.न्यथा कोणतेही वाहतूक भाडे अथवा गोदाम देयके मंजूर केल्या जाणार नाहीत . त्यामुळे होणाऱ्या नुकसानीची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मीलधारकाची राहील अथवा गोदाम धारकांची राहील, याची नोंद घेण्याचे जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांनी कळवले आहे.