ताज्या घडामोडी

शक्ती सन्मान महिला मेळाव्याचे आयोजन

खऱ्या अर्थाने मान.पंतप्रधान मोदी जी यांच्या कार्य काळातच महिला सुरक्षीत व महिलांना सन्मान..
खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन

शक्ती सन्मान महिला मेळावा भाजपा महिला आघाडी व संजविनी ग्रामसंस्था कारुटोला ता.सालेकसा च्या संयुक्त विद्यमाने आयोजित.

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी व संजविनी ग्रामसंस्था,कारुटोला (साक्ररीटोला)ता.सालेकसा जि.गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोज शनिवार ला शक्ती सन्मान महिला मेळाव्याचे आयोजन कारुटोला ग्रामपंचायत च्या पटांगणात करण्यात आले.
या शक्ती सन्मान महिला मेळाव्याला खासदार अशोक नेते यांनी संबोधित करतांना म्हणाले की,या देशाचे लाडके पंतप्रधान मान. नरेंद्र मोदी जी यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळातच महिला सुरक्षित व महिलांना सन्मान मिळाला आहे. असे उद्घाटन स्थानावरून खासदार नेते यांनी प्रतिपादन केले.
यावेळी मंचावर प्रामुख्याने या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते,महिला आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड.येशूलाल उपराडे,माजी आमदार आमगांव देवरी विधानसभा क्षेत्राचे संजयजी पुराम,भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा सभापती कृ.उ.बा.स. आमगांव केशवभाऊ मानकर, माजी अध्यक्ष जि.प.गोंदिया विजय शिवणकर, शिक्षणमहर्षी तथा जेष्ठ नेते झामसिंगजी येरणे,भाजपा उपाध्यक्ष तथा सभापती कृ. उ.बा.स.देवरीचे प्रमोद संगीडवार, सरपंच ग्रा.प. कारुटोला ऊमराव बोहरे,प्रदेश सचिव महिला आघाडी च्या रेखाताई डोळस,महिला बाल.कल्याण सभापती सविता पुराम, भाजपा सालेकसा तालुकाध्यक्ष गुमानसिंग उपराडे, भाजपा देवरी चे तालुकाध्यक्ष प्रविण दहिकर, भाजपा आमगांव तालुकाध्यक्ष राजेंद्र पटले, परसराम फुंडे,राजेंद्र गौतम, उपसभापती अनिल बिसेन,नितेश वालोदे,देवराव चुटे, प्रज्ञाताई संगिडवार, तालुकाध्यक्ष महिला मोर्चा देवकि मरई,अर्चना मडावी, प्रतिभा परिहार,सुषमा भुजाडे, मधूताई अग्रवाल,रोशनी गायकवाड,स्नेहा मानकर,कल्पना वालोदे, अंजूताई बिसेन,सुनंदा उके,गिताताई शेंडे, तिलकचंद मडावी, वैशाली पंधरे,योगिता फुंडे,शालिक गुरुनुले,ममता अंबादे,कौशल्या कुंभरे,सरिता हरिणखेडे,शामकला गावळ,नुतन सयाम,तनुजा भेलावे तसेच मोठ्या संख्येने महिला भगिनीं कार्यकर्ते उपस्थित होते.
या मेळाव्याला पुढे बोलतांना खासदार अशोक नेते यांनी महिलांना मार्गदर्शनात महिला सुरक्षित व महिलांना सन्मान देण्यासाठी शासन कटीबद्ध असून तिन तलाख,नारी शक्ती वंदन अधिनियम,मातृवंदन स्कीम, सौभाग्यवती स्कीम, सुकन्या योजना,महिला प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना, अशा अनेक योजना महिलांसाठी मोदी सरकारच्या कार्यकाळात महिला मुख्य प्रवाहात येण्यासाठी व सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून अंमलात व कार्यान्वित केलेले आहेत.
याबरोबरचं देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी महिलांसाठी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांसाठी अनेक योजना राबविल्या आहेतच माझ्या महिला भगिनींनी च्या डोक्यावर घागर राहू नये यासाठी हर घर नल,नल से जल, महिलांसाठी धुरमुक्त करण्यासाठी उज्वला योजना, महिला बाहेर उघड्यावर संडास जाऊ नये यासाठी स्वच्छतागृह अशा अनेक योजना महिलांसाठी लागू आहेत. महिलांना सामाजिक,आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील आहे.केंद्र सरकारने महिलांसाठी राजकीय आरक्षण 33% करून महिलांचा सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या वतीने राज्यभरात महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी या शक्ती सन्मान महिला मेळाव्या प्रसंगी उद्घाटन स्थानावरून प्रतिपादन केले.
यावेळी खासदार अशोक नेते यांना पुणे येथे संसद आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल याप्रसंगी महिला व भाजपा पदाधिकाऱ्यांनी खा.नेते यांना शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले.
याप्रसंगी महिला भगिनींनी उत्कृष्टपणे लेझीम द्वारे गाण्याचे सादरीकरण केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close