ताज्या घडामोडी

जागतिक अपंग दिनानिमित कार्यक्रम

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि.03/12/20 21 रोजी पाथरी नगर परिषद येथे ठिक दुपारी दोन वाजता पोलीस मित्र परीवार समन्वय समितीच्या वतीने संथापक अध्यक्ष आदरणीय डॉ. संघपाल उमरे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली 03 डिसेंबर 2021 जागतिक अपंग दिनानिमित्त सौ.सोमित्रा अशोक तांगडे व श्री. अशोक तांगडे अंधत्व व अपंग या दोन्ही पती पत्नी यांचा सत्कार करून फळे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष -म्हणून नगरसेवक मा.अन्सारी युसूफोद्यीन रफियोद्यीन यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे उदघाटकः म्हणून पाथरी नगर परीषद नगर अधयक्ष मा. नितेश भोरे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मा.सतिश वाकडे मा. शेख ईरफान शेख उस्मान नगरसेवक मा. अली साजेद बेलदार मा. विठ्ठल रासवे मा. माझी उपध्यक्ष मा. आबासाहेब कोरडे मा. हसेब खान तैजीब खान नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालनः मराठवाडा महिला विभाग प्रमुख मा. सौ.रेखाताई मनेरे यांनी केले तर आभार सौ.मुक्ता डोगंरे यांनी व्यक्त केले सौ.सुमन साळवे व रेखा मनेरे सौ.लता साळवे पदधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती व अनिल गालफाडे, आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व नगरसेवक यांनी सहकार्य केले अशा प्रकारे 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या व अपंग दिन साजरा करण्यात आला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close