अनिलराव नखाते यांचा वाढदिवसानिमित्त आदर्श सभापती म्हणून गौरव

कृषी उत्पन्न बाजार समितीतील कार्यक्रम.
माजी नगराध्यक्ष जुनैद खान दुर्राणी यांचेसह संचालक,व्यापारी शेतकरी यांची उपस्थिती.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
सामाजिक, राजकीय , सहकार व शैक्षणिक क्षेत्रात ” बोले तैसा चाले.. “या उक्तीप्रमाणे आपल्या कामाचा ठसा उमटवणारे पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांना वाढदिवसानिमित्त आदर्श सभापती म्हणून सोमवारी माजी नगराध्यक्ष जुनैद खान दुर्राणी यांचेसह संचालक, व्यापारी, शेतकरी ,कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीत ९ आँक्टोंबर रोजी सभापती अनिलराव नखाते यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष जुनैद खान दुर्राणी,उपसभापती शाम धर्मे,नारायणराव आढाव,संचालक विष्णुपंत काळे,आनंद धनले,अमोल बांगड,गणेश दुगाणे,रामप्रसाद कोल्हे,संजय सत्वधर,सय्यद गालेब ,अशोक आरबाड,सन्नी यांची उपस्थिती होती.याप्रसंगी मागील ८ वर्षापासून सभापती अनिलराव नखाते आपल्या कुशल नेतृत्वाखाली संचालक, शेतकरी, व्यापारी यांच्याशी योग्य समन्वय आणि वरिष्ठ कार्यालयाशी पाठपुराव्यातून बाजार समितीच्या यशस्वी प्रशासनाची राज्यशासनाने दखल घेतली.अशाप्रकारे सभापती अनिल नखाते यांचे आदर्श कामकाजाचा बद्दल जुनैद खान दुर्राणी यांचेसह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष जुनैद खान दुर्राणी यांचेसह संचालक, व्यापारी, शेतकरी ,कर्मचाऱ्यांनी सत्कारमुर्ती अनिलराव नखाते यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
असे राबवीले सामाजिक उपक्रम..
वाल्मिकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा पाथरी बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांच्या वाढदिवसानिमित्तं विद्यार्थ्यांच्या सुप्त कलांना व्यासपीठ उपलब्धतेसह त्यांचेप्रती सामाजिक भावना रूजावी असे सामाजिक उपक्रम म्हणून संस्थेअंतर्गत शाळेत पाथरी येथे समूह नृत्य स्पर्धा,रामपुरी येथे रांगोळी, कासापुरी येथे निबंध वालूर येथे घेतलेल्या चित्रकला व धावणे तर देवगावफाटा येथे चित्रकला स्पर्धा घेऊन या सर्व ठिकाणी ९ आँक्टोंबर रोजी पारितोषिक वितरण करण्यात आले.सोमवारी सामाजिक उपक्रमांतर्गत पाथरी येथील ओंकार वृध्दाश्रम येथे खाजगी शिक्षक शिक्षकेतर पतपेढी च्या वतीने अनिल नखाते व सौ.भावनाताई नखाते यांच्या हस्ते किराणा वस्तुचे वाटप करण्यात आले.सर्व कार्यक्रमासाठी आदित्य नखाते व अजिंक्य नखाते यांचेसह वाल्मिकी शिक्षण संस्थेचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
असा होता दिनक्रम…
सोमवारी सकाळी देवनांद्रा येथील जगदंबा देवी ला अनिल नखाते यांचे हस्ते अभिषेक केला नंतर कारखाना परिसरातील महादेव मुर्तीचे दर्शन व देवनांद्रा येथील शांताबाई नखाते अनुसूचित जाती आश्रमशाळेत अनिलराव नखाते व सौ.भावनाताई नखाते यांचे हस्ते वृक्षारोपण केले यावेळी कर्मचारी उपस्थित होते.शांताई निवासस्थानी भावनाताई नखाते यांनी अनिलराव नखाते यांचे औक्षण केले.त्यानंतर तारेख खाँ दुर्राणी यांचेसह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी,नागरीकांनी अनिलराव नखाते यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी अनिलराव नखाते यांचा वाढदिवसानिमीतं आदर्श सभापती म्हणून गोरव केला.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष जुनैद खान दुर्राणी,उपसभापती शाम धर्मे, नारायणराव आढाव,संचालक विष्णुपंत काळे,आनंद धनले,अमोल बांगड,गणेश दुगाणे,रामप्रसाद कोल्हे,संजय सत्वधर,सय्यद गालेब,अशोक आरबाड, सन्नी आदी मान्यवर उपस्थित होते .