आमदार बाबाजाणी दुर्याणी यांना मारहाण
जिल्हा प्रतिनिधी: अहमद अन्सारी परभणी
एका अंत्यसंस्कार ‘कार्यक्रमात राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दुपारी सुमारास घडली. या प्रकरणी आ. दुर्राणी यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आली असून प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण यांनी सांगितले सध्या पाथरी शहरात शांतता असून कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचेही ते म्हणालेआमदार बाबाजानी दुर्राणी हे आज एका अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात उपस्थित होते. याच ठिकाणी मोहम्मद देखील आला होता. दरम्यान, आ. दुर्राणी काही जणांसोबत वार्तालाप करत होते. योगायोगाने मोहम्मद बिन आणि आ. दुर्राणी समोरासमोर आले. यावेळी अचानक मोहम्मद बिन सईद याने दुर्राणी यांना मारहाण केली. नागरिकांनी हस्तक्षेप करत लागलीच त्याला पकडले. यावेळी त्याने धमकी आ. दुर्राणी यांना दिली.
आ. दुर्राणी यांनी मोहम्मद बिन याच्या विरोधात पाथरी पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. यावरून गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीला तत्काळ अटके करण्यात यावी, अशी मागणी करत आ. बाबाजानी दुर्राणी समर्थकांनी पोलीस स्टेशन बाहेर गर्दी केली होती. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडून काही काळ तणाव निर्माण झाला होता.