प्रियकराने प्रेयसीच्या हाताची नस कापून केला खून
प्रियसीने दिला होता लग्नाला नकार
लाखनी तालुक्यातील पालांदुर चौरास येथील घटना
प्रतिनिधी: नरेंद्र मेश्राम लाखनी
लाखणी तालुक्यातील पालांदुर येथील घटना घरून सामान घेण्याकरिता निघालेल्या युवतीचा मृतदेह पालांदुर कब्रस्थान परिसराच्या मागिल भागात आढळल्याने खळबळ उडाली असुन मृतक युवतीचे नांव शिल्पा तेजराम फुल्लूके (वय 19) मऱ्हेगांव (नविन) मृतक युवती संताजी कला व वाणिज्य महाविद्यालयाची द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी असल्याची माहिती असुन उपवर असल्यामुळे तिला पाहण्यासाठी महागांव(बंध्या) ता. अर्जुनी/मोर येथील युवक येणार होता. त्यामुळे सामान खरेदीच्या बहाण्याने (ता. 29) सकाळी 10 वाजता ती घरून निघाली त्यानंतर दुपारी तीन वाजताच्या सुमारास तिचा पालांदुर अड्याळ रस्त्यावरील कब्रस्थानाजवळ निर्जन स्थळी, संदिग्ध अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ रक्तरंजित चाकु, लाकडी दांडा तथा विषाची बाटली सापडल्याने मृत्यूचे गुढ वाढले होते. पालांदुर पोलीसांनी घटनेची नोंद केली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली, उपविभागीय पोलिस अधीकारी रविंद्र वायकर , अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिकेत भारती ,ठाणेदार तेजस सांवत घटनास्थळावर पोहोचले.शरीरावर रक्ताचे डाग असल्याने हत्या असल्याचे संशय पोलिसांना दिसून येत होते. त्यानुसार तपासणी चे चक्र पोलीस यांनी फिरवले संपूर्ण माहितीची पडताळणी केली. आरोपी हा एकाच महाविद्यालयात शिकलेले आहेत. मृतक युवतीचे लग्नाचे वय झाल्याने तिच्या घरच्या लोकांनी तिचे लग्न जुळवण्यासाठी मुलं बघणे सुरू केले होते .आरोपी हा सुद्धा त्याच्या आई सोबत मृतक युवतीला लग्नाकरिता मागणी घालायला गेला होता .परंतु मृतक युवती व तिच्या कुटुंबाने आरोपी हा काही काम धंदा करीत नाही. आणि त्याची पोट जात वेगळी असल्याने लग्नाला नकार दिला. याचा राग मनात धरून आरोपीने मृतक युवती ला सामान खरेदी करण्यासाठी पालांदूर ला आली असता तिला सदर घटनेच्या ठिकाणी नेऊन धारदार चाकूने तिच्या हाताच्या नसा कापून खून केला या प्रकरणात रात्री उशिरा पर्यंत तरुणावर खुणाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली .फिर्यादी मृतक युवतीची आई शिला तेजराम फुल्लुके ईच्या तक्रारीवरुन पालांदुर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी नयन विश्वनाथ शहारे (19 )याच्याविरुद्ध अप. क्र.163/2021नुसार कलम 302 भांदवि गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पालांदूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार तेजस सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.