ताज्या घडामोडी

ओबीसींचे आरक्षण संपविणाऱ्या मोदी सरकारचा मुल तालुका, शहर व महिला कांग्रेसच्या वतीने निषेध

ओबीसींची जनगणना झाली पाहिजे- संतोषसिंह रावत

तालुका प्रतिनिधी :हेमंत बोरकर मुल

ओबीसींची फसवणुक करणाऱ्या मोदी सरकारचा आणि उलटा-चोर कोतवालको दाटे अशी भूमिका घेऊन खोटे बोलणाऱ्या तत्कालीन फडणवीस सरकारचा निषेध असो, सर्वत्र महागाई, बेरोजगारी, वाढविणाऱ्या केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि ओबीसी संवर्गातील सर्वांना आरक्षण मिळण्यासाठी ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे,शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना, राज्य घटनेने दिलेले अधिकार मिळालाच पाहिजे असे मार्गदर्शन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी कांग्रेसच्या निषेध आंदोलना मध्ये करून मोदी सरकारचा निषेध केला. ओबीसी आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिनी मुल तालुका व शहर आणि महिला कांग्रेस कमिटीच्या वतीने गांधी चौक मुल येथे निषेध आंदोलन करण्यात आला. याप्रसंगी तालुका कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात ओबीसी आरक्षण रद्द करणाऱ्या मोदी सरकारवर बंदुभाऊ गुरनुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डाँक्टर पद्माकर लेनगुरे, माळी महासंघाचे विभागीय महासचिव गुरू गुरनुले, कांग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष गुरुदास चौधरी, माजी जि. प.सदश मंगला आत्राम, कृषी बाजार समितीचे संचालक किशोर घडसे,युवक अध्यक्ष पवन निलमवार, शहर उपाध्यक्ष सुरेश फुलझेले यांनी आरक्षणावर आपले परखड विचार व्यक्त करून निषेध केला. निषेध आंदोलनामध्ये संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर,उपसभापती संदीप कारमवार, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, संचालक तथा भेजगावचे सरपंच अखिल गांगरेड्डीवार, किशोर घडसे, शांताराम कामडे, आदर्श सहकारी खरेदी विक्री सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, महिला कांग्रेस अध्यक्षा रुपाली संतोषवार, नगर सेवक विनोद कामडे,लीना फुलझेले, शहर कांग्रेस अध्यक्ष सुनील शेरकी, युवक शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार, दिनेश जिद्दीवार, किसान कांग्रेसचे रुमदेव गोहणे, प.स.माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, राजू ठाकरे, कैलास चलाख, विवेक मुत्यालवार, कोसंबी सरपंच रवी कामडी, तांडाला उपसरपंच राहुल मुरकुटे, योगेश शेरकी, जालिंदर बांगरे, राजेंद्र वाढई, शाम पुठ्ठावार, अनिल निकेसर, केळझर उपसरपंच मराठे, संदीप मोहबे, गणेश रणदिवे, संदीप म्हस्के, अरविंद बोरूले,आदर्श रायपुरे यांचेसह अनेक ग्रामीण कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close