पाथरी येथे 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा


जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी पोलिस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.संघपाल उमरे, साहेब यांच्या नेतृत्वाखाली मा.रेखा मनेरे महाराष्ट्र राज्य महिला विभाग उपाध्यक्ष मा. अहेमद अन्सारी मराठवाडा संघटक मा. शेख अजहर हादगावकर , मराठवाडा अध्यक्ष मा.शेखा ईफतेखार बेलदार जिल्हा सचिव व इतर सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली, पाथरी येथे 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि भारताचे संविधान वाचन करुन प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.सौ. जयाताई सहजराव कार्यक्रमाचे उद्घाटक मा .सौ. चंदा शेषेराव धोतरे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्रीमती संजीवनी सिद्धार्थ उजगरे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती आणि सूत्रसंचालन व प्रस्ताविक, पोलिस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. सौ.रेखाताई मनेरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मा. सौ.अंकिता सुर्यवंशी यांनी केले आणि 75 वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना पहिली ते बालवाडी मुलींना व मुलांना बिस्कीट मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले अशा प्रकारे पोलिस परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉ.संघपाल उमरे साहेब यांच्या नेतृत्वाखालील हया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व सर्व मान्यवरांना पुष्प गुचछे देऊन मा. रेखा मनेरे यांच्या सत्कार करण्यात आला आणि 75 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले आणि सर्व मान्यवरांना 75 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम आकांक्षा धोतरे, कु.श्रद्धा राहुल मनेरे, धनश्री दिपक ढवळे,जया सहजराव,,सौ.सुशिला मनेरे, *अंकिता सुर्यवंशी, सौ.चंदा धोतरे, रेखा मनेरे , श्रीमती संजीवनी उजगरे ,आणि पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी यांच्या वतीने पाथरी येथे मोठ्या उत्साहात 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला