धर्मपूरी वंनोपज तपासणी नाक्यावर लाखो रुपये सागवान फर्नीचरची अवैध वाहाकावर कार्यवाही

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
वाहनाने अवैध रित्या सागवन फर्नीचरची वाहतूक करनाऱ्याकडून 9 लाख 1 हजार 216 रुपयांचा मुद्देमाल
जप्त केल्याची कार्यवाही सिरोंचा वनपरिक्षेत्र कार्याल्याने तालुक्यातील धर्मपूरी वनोपज तपासणी नाक्यावर आज सकाळी 4:30 सुमारास केली. या प्रकरणी चार जनावर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमद कासिमसाब मुल्ला, रवि मल्लय्या दुर्गम हे दोन्ही रा. मरपल्ली, सागर श्रीशेलम कोंडी रा. उमानूर व फर्निचर मार्ट चे मालक श्रीनीवास एस. इम्मडी असे आरोपीचे नाव आहेत. धर्मपूरी तपासनी नाक्यावर कार्यरत वनपाल आर.व्हि.जवाजी यांन्ही नाक्यावर MH 33 T 2123 या वाहनाला थाम्बवुन तपासणी केली असता वाहनात सागवन फर्नीचर आढळुन आले. संबंधित मालका बद्दल वाहन चालक व वाहन मालकाशी विचार पुस केले असता, त्यानी वाहतुक परवाना दाखविली सदर सदर वाहतुक परवाना सिरोंचा ते मरपललि पर्यंत वाहतूकीचा दिसून आला. तेव्हा वनविभागच्या कर्मचारयानी शहनीशा करण्यासाठी सदर वाहन सिरोंचा वन परिक्षेत्र कार्यालयात आनले चौकशी दरम्यान सदर माल अवैध आसल्याचे निष्पन्न झाले. 6 नग फर्निचर, साग नग 98,bघन मीटर 0.730 मालाची किमत 51216/- व जप्त वाहनाची किमत 8,50,000/- असे एकूण 901216/- करुन भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 व महाराष्ट्र वन नियम कलम 31 व 82 नुसार चार जनावर वन गुन्हा नोंदविण्यात आला. असुन मा. सुमीत कुमार भा.व.से. उप वन संरक्षक प्रविण कुमार भा.व.से. उप विभागीय वन अधिकारी सिरोंचा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. कटकू वनपरिक्षेत्र अधिकारी सिरोंचा, आर. व्हि.जवाजी क्षेत्र साहाय्यक कारसपललि, जे.टी.निमसरकर क्षेत्र साहाय्यक सिरोंचा, महेश जवाजी, महेश मादरबोना यानी केली. पुढील तपास एस.जी.बडेकर साहाय्यक वन संरक्षक सिरोंचा हे करित आहे.