गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाची सभा संपन्न
प्रतिनिधी: नरेंद्र मेश्राम लाखनी
दिनांक १२/१२/२०२१ रोज रविवारला दुपारी २:०० वाजता शहीद भोला भवन काँग्रेस कार्यालय येथे गोंदिया जिल्हा कॉंग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागातर्फे जिल्हा स्तरीय प्रतीभावंत कलावंत यांची सभा मा. गणेशजी लिमजे राज्य उपाध्यक्ष तथा विदर्भ समन्वयक सांस्कृतिक विभाग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले सभेत प्रमुख अतिथी म्हणुन गोंदिया जिल्हा कॉंग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी पंचभाई सर, पृथ्वीराज तांडेकर माजी नगरसेवक भंडारा, थामदेव निमजे मोहाडी सामाजिक कार्यकर्ते, सुर्यप्रकाश भगत अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी रावनवाडी, जिल्हा महासचिव नितीन साखरे, महासचिव विलास बडोले, टोलीराम पारधी सचिव, घनश्याम टेंभुर्णिकर गोरेगांव तालुका अध्यक्ष, वसंता सोनवाने, अशोक काळबांधे, भास्कर कवरे, काशीनाथ मेंढे, ग्यानीराम डोये, लिखनलाल निर्विकर, माधवराव खोटेले, कृष्णकुमार पटले, राजाराम ब्राम्हनकर, जगन ठाकरे, घनश्याम बहेकार, भरत पाथोडे, हरीचंद शहारे, श्रीकिसन मेश्राम, सुभाष कापसे, यादोराव मोहनकर, माधोराव खोटेले, हेमराज खोटेले, हरिराम फुंडे, लक्ष्मण पटले, रघुनीथ येळे, शामराव ठाकुर, चेतन येळे, सौ.उज्वला बडोले, सौ.देवका चाचेरे, सौ.जिवनकला सिंगाडे, सौ.सुनिता हत्तीमारे यांच्या उपस्थितीत पार पडले. सभेत सांस्कृतिक विभागाचे नियोजन करण्यात आले. तसेच कलावंतांच्या समस्या तसेच वृद्ध पेन्शन योजना, राज्य शासनाच्या योजना, केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या योजना यांची माहिती देण्यात आली. तसेच जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी व सर्व तालुका अध्यक्ष यांचे नियुक्ती आदेश मा.गणेशजी लिमजे राज्य उपाध्यक्ष तथा विदर्भ समन्वयक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.सभेचे संचालन टोलीराम पारधी जिल्हा सचिव सांस्कृतिक विभाग गोंदिया यांनी केले तर समारोप नितीन साखरे जिल्हा महासचिव सांस्कृतिक विभाग गोंदिया यांनी केले. सभेत जे काही कलावंतांच्या समस्या व त्यांच्या उत्कर्षाकरीता योजना राबऊन समस्याचे शासनाकडे पाठपुरावा करण्यात आले आहे…