ताज्या घडामोडी

वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळंब येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळंब. ता. इंदापूर जि. पुणे येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष देवकर सर होते. देवकर सर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी मनोगत व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माने सर यांनी केले. तर सूत्रसंचालन माननीय श्री काशीद सर यांनी केले.
माध्यमिक विभागातील इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी थोडक्यात मनोगते व्यक्त केली..
इयत्ता पाचवी मधील स्वराली हनुमंत जाधव, समीक्षा युवराज गोरे, इयत्ता सहावी मधील तेजस्विनी अनिल जाधव, इयत्ता आठवी मधील राधिका अनिल जाधव, रुचिता गणेश राऊत, अपेक्षा सचिन वनवे, यशवंती अजित खरात, प्रांजली श्रीरंग वाघमोडे या विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली.
स्वराली हनुमंत जाधव, रुचिता गणेश राऊत, राधिका अनिल जाधव या विद्यार्थिनींनी “मी जिजाऊ बोलतेय” यावर एकपात्री नाट्य सादर केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे युवा संचालक प्रताप सिंह कदम सर , प्राचार्य माननीय श्री. सुरेश अर्जुन सर, पर्यवेक्षक श्री. आळंद सर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती पाटील मॅडम,श्री.काशीद सर, श्रीमती सोलनकर मॅडम, श्रीमती हजारे मॅडम, श्री राऊत सर, श्री माने सर, श्री धनवडे सर, श्री पाटोळे सर व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार श्री धनवडे सर यांनी मानले. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close