ताज्या घडामोडी
झाडीपट्टीच्या नाटकांना येत्या दिवाळी पासून मिळणार परवानगी

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड
झाडीपट्टीच्या नाटकांना येत्या दिवाळी पासून परवानगी मिळणार आहे. असे राज्य शासनाने २२ ऑक्टोबर २०२१ पासून चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी दिली आहे, त्यामुळे झाडीपट्टीतील सर्व नाटक कंपनीच्या नाट्य कलावंतांना दिलासा मिळणार आहे. मागील १८ महिन्यांपासून कोरोना मुळे झाडीपट्टीतील नाटक बंद होते. परंतु, शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेचे पालन करून नाट्यगृह सुरू होणार आहे. असे कळताच कलावंत व निर्मात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वडसा झाडीपट्टी रंगभूमीवर एकुण ५५ ते ६० नाट्य मंडळे असून त्यामध्ये कलावंत , नेपथ्य, साउंड सिस्टीम पडद्यामागील कामगार यांच्या ऊपजिवीकेचे साधन मागील अंत्य महिन्याच्या विश्रांती नंतर पुन्हा बळकट होणार आहे.