महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली नवीन रुग्णावाहिका

जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न..!!
अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांची प्रमुख उपस्थिती..!!
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
अहेरी, ०९ ऑक्टोबर :- तालुक्यातील महागाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रांतर्गत 22 गावांचा समावेश आहे. मात्र या ठिकाणी रुग्णावाहीका नादूरूस्त असल्यामुळे रुग्णांना अडचण भासत होती. राज्य शासनाकडून जिल्हा परिषद गडचिरोलीला आठ रुग्णावाहीका उपलब्ध झाले आहे. त्यातूनच जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांनी त्यांच्या मार्फतीने महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रला रुग्णवाहिका दिल्याने पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आभार मानले असुन या भागातील नागरिकांना सोईचे झाले आहे.
आज महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सदर रुग्णवाहिकेची लोकार्पण करण्यात आले. सदर लोकार्पण सोहळ्याला अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, आ.वि.सं. सल्लागार एटापल्ली प्रज्वल नागुलवार, आ.वि.सं. शहर अध्यक्ष अहेरी प्रशांत गोडसेलवार, महागावचे सरपंच सौ. पुष्प मडावी, उपसरपंच संजय अलोने, अशोक येलामुले, माजी उपसरपंच मारोती करमे, ग्रा.पं. सदस्य राजू दुर्गे, चंद्राजी रामटेके, ग्रा.पं. सदस्य वंदना दुर्गे, सोनू अमर गर्गम, भीमन्ना पानेम, विनोद रामटेके, लिंगा दहागावकर, स्वामी आत्राम, प्रमोद रामटेके, गुरुदास दुर्गे, मोनेश पाटील, गणेश चौधरी, माजी सरपंच श्रीनिवास आलाम, प्रविण दुर्गे तसेच आरोग्य कर्मचारी डॉ. डी.व्ही. येरावार, डॉ. दर्शना राऊत, एम बागडे, इतर कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.