भंडारा जिल्हा कार्यकारणी घोषीत

प्रतिनिधी:नरेंद्र मेश्राम लाखनी
तीन वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे २०१८ ते २०२१ या कालावधीत घोषित कार्यकारणी विसर्जीत करून,प्रांत बैठकीत ठरलेल्या वेळा पत्रकानुसार आज दिनांक २१ नोव्हेंबरला भंडारा जिल्हाची बैठक भंडारा येथील सितलामाता मंदीर येथे, प्रांत महामंत्री मा.बाबूराव देशमूख, प्रांन्त प्रभारी श्री.राजेशजी राणे, संघटनमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
बैठकीला ४ तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित प्रतिनिधीतुन नविन जिल्हा कार्यकारणीची पुढिल प्रमाणे निवड करण्यात आली.

यामध्ये १)अध्यक्ष- श्री. सुरेंद्रजी पांडे भंडारा
२)उपाध्यक्ष- शेषराव निखाडे, लाखणी
३)उपाध्यक्ष- सौ.गिताताई गि-हेपूंजे धारगावं
४)जिल्हामंत्री- पराग ठवकर मचारणा त.लाखणी
५)जिल्हासहमंत्री- अनिल ब्राह्मणकर विरली खं. त. पवणी
६)कार्यालयमंत्री- रतिरामजी हजारे, ता. लाखणी
७)युवा प्रमुख- भुपाल पडोळे त.लाखांदुर
८)प्रसिद्धी प्रमूख- विलास केझरकर यांची निवड करण्यात आली.