पंचायत समिती सदस्य श्री. पुंडलीकराव मत्ते यांचे हस्ते समता प्रभागसंघ कार्यालयाचे उदघाटन
प्रतिनिधी :हेमंत बोरकर मुल
दिनांक 29 डिसेंबर 2021 ला मौजा खडसंगी येथे समता प्रभागसंघ खडसंगी- मुरपार कार्यालयाचे उद्घाटन श्री. पुंडलीकराव मत्ते पंचायत समिती सदस्य चिमूर यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आले.
सदर कार्यक्रम करीता श्री. पुंडलीकराव मत्ते पंचायत समिती सदस्य पंचायत समिती चिमूर, श्री. राजेश बारसागडे BMM, सौ. मस्के मॅडम मुख्याध्यापिका जि. प. शाळा खडसंगी, सौ. थुटेताई प्रभागसंघ अध्यक्ष, सौ. पेंदामताई प्रभागसंघ सचिव, श्री. मडावी सर BM IBCB, श्री. ब्राह्मणे सर BM FI, श्री. बोरकर सर CC, श्री. गेडाम सर CLM उपस्थित होते.
श्री. बारसागडे सर यांनी दशसूत्री बाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच अन्न, आरोग्य, पोषण आणि स्वच्छता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. पुंडलीकराव मत्ते पं. स. सदस्य चिमूर यांनी कोविड परिस्थितीत घ्यावयाची काळजी व स्वच्छता यावर सविस्तर मार्गदर्शन केले. सौ. मस्के मॅडम मुख्याध्यापिका जि. प. शाळा खडसंगी यांनी बचतीचे महत्व पटवून सांगितले.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक
सौ. थुटेताई समता प्रभागसंघ अध्यक्ष यांनी केले. सौ. काजल पटील ICRP खडसंगी यानी कार्यक्रमाचे संचालक केले तर उपस्थितांचे आभार सौ. दुर्गाताई रोकडे ICRP नवेगाव पेठ यांनी मानले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभागातील सर्व
ग्रामसंघाचे पदाधिकारी, ICRP, प्रभागसंघ लिपिका, पशूसखी, कृषिसखी, मत्ससखी यांनी सहकार्य केले.