ताज्या घडामोडी

अवकाळी पाऊस, गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या :- नुमान चाऊस

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यामध्ये गहू, हरभऱ्यासह इत्यादी पीक हे काढायच्या टप्प्यात आली होती परंतु अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व प्रचंड गारपीटीमुळे सर्वत्र शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहेत. हा नुकसान शेतकऱ्याच्या काळजाचा ठोका चुकवणारा आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे घेऊन पीक लागवड केलेली होती. प्रचंड आशा ठेवून त्यांनी पीक उगवलेला आहे. अचानक झालेल्या या पावसा व गारपिटीमुळे व त्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे पुढे पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे धन उरलेला नाही. अगोदरच नुकसानीत असलेला शेतकरी अजून नुकसानीत गेलेला आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढण्याची प्रचंड शक्यता आहे. म्हणून शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी व पुढील हंगामात पीक लागवड सुरळीत होण्यासाठी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई/आर्थिक मदत देऊन त्यांना आर्थिक विवंचनेतून लवकरात लवकर बाहेर काढावे अशी मागणी राज्य सरकारला मौलाना आझाद युवा मंच तर्फे करण्यात आलेली आहे. ही मागणी जिल्हा अध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केली .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close