स्व . नितीन महाविद्यालयात दोन दिवसीय नितीनोत्सव स्नेहसंमेलनास प्रारंभ

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
स्व . नितीन महाविद्यालयाच्या नितीनोत्सव २०२२-२३ स्नेहसंमेलनाला सकाळी १० वाजता प्रारंभ होणार आहे.
या वेळी या स्नेहसंमेलनाचे उदघाटन संस्था सचिव कुणालराव लहाने यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ आर एस फुन्ने हे उपस्थित राहाणार आहेत.
यावेळी साडे दहा ते साडे बारा या वेळेत आनंदनगरी,साडे बारा ते दोन मुलां,मुलिंच्या क्रिडा स्पर्धा संपन्न होतील. तर शुक्रवार १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत नृत्यस्पर्धा,साडे बारा ते दिड अंताक्षरी,दोन ते अडीच अल्पोपहार,तीन ते साडे तीन गीत गायन,साडे तीन ते साडेचार या वेळेत शेलापागोटे वाचन. या नंतर बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून टिव्ही स्टार असलेले प्रसिध्द कवी प्रा डॉ कल्याण कदम हे उपस्थित राहाणार आहेत. तर प्रमुख उपस्थितीत संस्थाध्यक्ष माजी आमदार हरीभाऊ काका लहाणे यांची उपस्थिती असणार आहे.या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर एस फुन्ने हे राहाणार आहेत. या नितीनोत्सव स्नेहसंमेलना साठी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संखेने उपस्थित राहाण्याचे आवाहन महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा डॉ आर एम जाधव यांनी केले आहे.