ताज्या घडामोडी

ज्येष्ठ नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प करून राष्ट्रसंताला वाहीली आदरांजली

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

दिनांक ३० एप्रिल ला तुकडोजी महाराजांची जयंती निमित्त सामूहिक वाढदिवस सोहळा व आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन वरोरा येथील अंबादेवी देवस्थानच्या परिसरात करण्यात आले . सकाळी ९ वाजता तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सकाळी ९ वाजता परीसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.९.५० ला भावगीत गायन करण्यात आले.१० वाजता राष्ट्रसंताची ग्रामगीता यावर प्रबोधन झाले . ठिक ११ वाजता ज्येष्ठांचे आरोग्य विषयावर वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. त्यांनी तुकडोजी महाराजांना शब्द सुमनाने मानवंदना दिली.तसेच अंबादेवी चा मंत्र म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली.
संतांचे भजन !!मनि नाही भाव म्हणे देवा मला पाव, ..या भारतात बंधू भाव नीत्य असू दे वरती असा दे.. ,घडी घडी म्हणै तुझे नाम जपावे चीतस्तीर होऊनीया चरण पाहावें रे चरण पाहावें.अशी गित गाऊन तुकडोजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकुण त्यांची शिकवण ऐकवली.आणी त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आवाहन उपस्थितांना करण्यात आले.खाण्यापिण्याच्या रेसेपी विषयी माहिती देण्यात आली.देशात बेरोजगारी चे प्रमाण खूप वाढले आहे त्यासाठी शिक्षित मुलामूलींनी आपले विचार प्रवाह बदलायला पाहिजे असे प्रतिपादन केले.म्हणजे मूलगा नोकरी करत असेल तर मुलगी नोकरीवालीच हवी ही अट ठेवू नये.किंवा मुलगी नोकरी वाली असेल तर मुलगा नोकरीचाच मिळाला पाहिजे अश्या अटी ठेवू नये कारण एक जण जरी नोकरी केली तरी ऊदारनिर्वाह चांगल्या पद्धतीने होवू शकतो व देशाला हातभार लागेल.तसेच मुली सासरी जातात सासूसासर्यांना आयूष्याचे आईवडील समजून देखभाल केली पाहिजे.आईवडील हे जन्मांचे असावे व सासू सासरे हे आयुष्यचे समजावे आणि काहींना मुली आहेत मूल नाही त्यांचा सांभाळ जावयाने मूलगा बनवून करावे.एकंदरीत एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहवे.एकमेकांना समजून घेवून वागावे. वरोरा शहराच्या स्वच्छते बद्दल समजावून सांगितले. दररोज साफसफाई झालीच पाहिजे, पर्यावरणाविषयी सांगितले गेले. झाडे लावा,झाडे जगवा…आणि पाणी अडवा, पाणी जिरवा.. असे संदेश देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते तापमान बघता प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावायला पाहिजे असे पर्यावरणाविषयी वंदना बरडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले, पंतप्रधान जनधन योजना, शासकीय रुग्णालयातील सर्व मोफत सुविधांविषयी, ज्येष्ठांसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजना ची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमामध्ये अवयव दान आणि नेत्रदानाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी प्रेरित होऊन 21 ज्येष्ठ नागरिकांनी नेत्रदान तर 20 नागरिकांनी अवयवदान साठी अर्ज केला आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिका तर्फे आपली नोकरी सांभाळून समाजकार्य करणारी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथील अधिसेविका वंदना विनोद बरडे यांचा शाल, श्रीफळ तसेच ग्रामगीता पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकाचा सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रसंतांच्या !!कधी येशील मनमोहना पाहण्या भारत अपुला पुन्हा!! या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close