‘विहार जिथे अभ्यासिका तिथे ‘ उपक्रमास शेगावला प्रारंभ
दानशुराच्यां सहकार्याने उपक्रमास सुरुवात
अभ्यासिका उद्घाटन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
प्रतिनिधी :हेमंत बोरकर
तथागत बुद्धांच्या काळापासुन हजारो वर्ष तत्कालीन दानशुर लोंकाकडून बांधुन दिलेल्या विहारा मध्ये ज्ञान दान तथा आदर्श व्यक्ती,समाज व देशाला आवश्यक विषय ज्ञानाचा अभ्यास, मार्गदर्शन आणी चर्चा व्हायची.हा उद्देश लक्षात घेऊन विहार जिथे तिथे अभ्यासीका हा उपक्रम समाजातील दानशुरांच्या मदतीने राज्यात राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका नावाने सुरु आहे. याच उपक्रमा अंतर्गत वरोरा तालुक्यातील शेगाव येथेही मिलींद बौद्ध विहारात अभ्यासीका सुरु करण्यात आली.
समाजातील गरजु,गरीब आणी वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आनण्या करीता बऱ्या पैकी अर्थार्जन करणाऱ्या समाज घटकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कमाईचा २० वा भाग समाजाच्या भल्यासाठी खर्च करावा असे सांगीतले. त्याप्रमाणे काही दानशुर तथा समाज हितचिंतकांनी एकत्र आले. समाजातील गरीब व गरजु विद्यार्थ्यांचे शासकिय नोकरी व अधिकारी बनण्याचे स्वप्न पुर्ण करण्या करीता राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीका जेथे विहार तेथे अभ्यासिका हा उपक्रम सुरु केला.या उपक्रमाने चळवळीचे रूप घेऊन राज्यात जवळपास पन्नासच्या वर राष्ट्रपिता महात्मा फुले अभ्यासीका सुरु असुन या द्वारे अनेकांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करूण शासकिय नोकरी व अधिकारी बनण्याचे स्वप्न पुर्ण केले.
वरोरा तालुक्यामधील शेगाव येथील ठानेदार अविनाश मेश्राम यांच्या पुढाकाराने व सहकार्याने वरोरा तालुक्यातील शेगाव येथील मिलींद बौद्ध विहारात राष्ट्रपिता महात्मा फुले अभ्यासिका सुरु करण्यात आली.या अभ्यासीकेचे उद्घाटन अमरावतीचे पोलिस अधिकारी राहुल तसरे यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वशीष्ट पेठकर,प्रमूख पाहुणे ॲड.सुरेंद्र मेश्राम,ठानेदार अविनाश मेश्राम,पोलीस उप निरीक्षक प्रविण जाधव,सतीश रामटेके,रोहित मेश्राम इत्यादी मान्यवर यावेळेस उपस्थित होते.मान्यवराची उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले.उद्घाटन प्रंसगी अमरावती येथील अभ्यासिका तर्फे ५ooo रुपये,माणकर साहेब ५००० रुपये,देवेन्द्र चिकटे खेमजई १००० रुपये,शेगावचे सरपंच सिद्धार्थ पाटील यांनी ५ खुर्ची,विनोद चिकटे २ खुर्ची ,वशीष्ट पेठकर १४ पुस्तके, ठाणेदार शेगाव अवीनाश मेश्राम यांनी १० टेबल दिले.हि अभ्यासिका गरीब,गरजु तथा अभ्यासु विद्यार्थ्यांकरीता निशुल्क राहणार आहे .