सोशल एज्युकेशन मुव्हमेंट गडचिरोली युनिट चामोर्शीच्या वतीने राज्यस्तरीय संविधान जागर स्पर्धेचे आयोजन

ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा
सोशल एज्युकेशन मूव्हमेंट गडचिरोली यूनिट चामोर्शी च्या वतीने दिनांक २६ नोव्हेंबर 2021 ला संविधान दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय संविधान जागर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.भारतिय संविधानाची अंमलबजावणी होऊनही पाहिजे त्या प्रमाणात समाजात जागृती अभावी आज अनेक समस्या आवासुन उभ्या आहेत.त्या समस्या निराकरण करण्याचे सामर्थ्य संविधानाच्या योग्य अंमलबजावणीत आहे , याची जाणीव ठेवून यूनिट चमोर्शीच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत राज्यभरतील शाळा,महाविद्यालय,बचत गट,सामजिक संस्था सहभागी होऊ शकतात .सहभागी स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय ,चतुर्थ, आणि पाच क्रमांकाचे अनुक्रमे १०००० , ७००० , ५००० , ३००० व १००० रु. चे बक्षिस देण्यात येईल . याशिवाय १० स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिस तसेच स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना e.certificate देण्यात येईल.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नाही.३० नोव्हेंबर पर्यंत स्पर्धेत सहभागी होता येईल. तरी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देवानंद उराडे मो. क्र.९७६५६२७३१०, व सचिन मेश्राम मो.क्र. ९४२०१८९१४३ या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच स्पर्धेत सहभाग घेनाऱ्या संस्थेने संविधान दिन साजरा केल्याचा 3 मिनिटाचा वीडिओ.10 फोटो आणि कार्यक्रम अहवाल सोशल एज्युकेशन मुवमेंट च्या नमुद केलेल्या सम्पर्क क्रमांकावर पाठवावे असे अवाहन सोशल एज्युकेशन मुव्हमेंटच्या वतीने करण्यात आले आहे.