परमपूज्य साईबाबा जन्मस्थान मंदिरात महादेवाला महारुद्रा अभिषेक
प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी येथे परमपूज्य श्री साईबाबा जन्मस्थान मंदिरात पहिला श्रावणी सोमवार निमित्त वे.शा.स. उमेश शास्त्री जोशी सावरगावकर तसेच सौ उर्मिला उमेश जोशी यांचे शुभहस्ते महादेवाला महारुद्राभिषेक करण्यात आला. परम पूज्य श्री साईबाबांचे घरात महादेवाची पिंड मिळाली ती सध्या आहे त्या परिस्थितीत साईभक्तांच्या दर्शनार्थ श्री साई स्मारक समिती च्या व्यवस्थापन मंडळाने जतन करून ठेवलेली आहे साईबाबा जन्मस्थान मंदिरात रामनवमी गुरुपौर्णिमा पुण्यतिथि या उत्सवाचे मुख्य दिवशी महारुद्राभिषेक करण्यात येतो परमपूज्य श्री साईबाबा यांनी त्यांच्या हयातीत त्यांचे भक्त मेघा यांना साक्षात महादेवाच्या रूपात दर्शन दिले होते .श्री साई स्मारक समिती पाथरी च्या व्यवस्थापन मंडळाने परमपूज्य श्री साईबाबा जन्मस्थान मंदिरात महादेवाच्या पिंडीची नंदीची स्थापना केलेली आहे.